By : Polticalface Team ,21-02-2023
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी विठ्ठल रिफाईन्ड शुगर या शहरालगत असलेल्या कारखान्याचे प्रदूषण होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे , बाॅयलरची राख मोठ्या प्रमाणावर पडत असून राखेच्या प्रदूषणामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाकडे केली होती.
त्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली आहे.होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने आढळून आलेल्या त्रुटी संदर्भात कारखान्याला समज पत्र देण्यात आले आहे.तसेच कारखान्याकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत तात्काळ जाहीर खुलासा करण्याचे आदेशही कारखान्याला देण्यात आले आहेत.