By : Polticalface Team ,21-02-2023
या पैकी मुलांच्या मधुन फक्त पाच नंबरचा मुलगा वसंत हा फक्त गावावरच राहिला तो कधीच मुंबईला कामानिमित्त गेलाच नाही बाकी पाच मुले जसे जसे मोठे होत गेले तसे तसे रेसकोर्स मध्येच काम करत गेले आजतागायत यांची काही कुटुंबातील सदस्य त्या ठिकाणीच आहेत तर काही श्रीगोंदा शहरात आहेत त्या कुटुंबातील हा पाच नंबरवाला मुलगा गावाकडेच राहुन सुरूवातीस मिळेल ते काम करून राहात असे नंतर त्याने ट्रकवर ड्रायव्हरला मदतनीस म्हणून कामाला सुरुवात केली ड्रायव्हर शरीफभाई शेख आणि याची चांगलीच मैत्री पुढे झाली होती एक जिव्हाळा यांचा तयार झाला होता त्याच कामातुन ट्रकच्या सर्व पार्टची माहिती चांगल्या प्रमाणात झालेली होती कधी ट्रक मध्ये काही बिघाड झाल्यास ते काम हे स्वताच एकांद्या फिटर सारखे करत असे ड्रायव्हिंग येत असताना देखील ड्रायव्हर की म्हणून कधीच ते काम याने केले नाही आयुष्यातील जास्तीतजास्त दिवस हे ड्रायव्हर मदतनीस म्हणूनच घालवले.
पुढे ट्रक मालकाने काही कारणास्तव तो ट्रकच विकला ट्रक विकल्यानंतर ड्रायव्हरसह हे वसंतराव घरीच बसले त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर ट्रक ड्रायव्हर शरीफभाई यांनी व्यापारी लोकांच्या आग्रहास्तव आपला स्वताचा एक ट्रक घेण्याचे ठरवले व घेतला पण ट्रक घेतल्यानंतर मदतनीसची गरज होतीच याकरता त्याने पुन्हा आपल्या जिवलग मित्राला सहाय्यकास आपल्या परिवारातील सदस्य असल्यासारखेच समजुन सोबत घेतले पुढे काही दिवस गेल्यानंतर तब्येत साथ देत नसल्यामुळे ते काम सोडावे लागले आणि काम सोडल्यावर घरात खर्चिक असलेल्या अडचणी जास्त प्रमाणात सतावून सोडू लागल्या होत्या त्यामधुन काही मार्ग सापडत पण नसल्यामुळे हवालदिल झालेले हे कुटुंब दररोजच खर्चा करिता कोणापुढे हात करायचा रूपये कोणाला कसे सतत मागावेत या विचाराने हैराण झालेली त्याची सहचारिणी ( पत्नी ) गीताबाई वसंत पाटोळे हे सासरकडील व माहेरकडील नाव जनाबाई आपला स्वताचा काहीतरी मार्ग शोधू लागली
माहेरकडील शांताबाई आणि गुलाब काळे या पती पत्नीला तीन मुले तीन मुली बापुराव, गीताबाई उर्फ जनाबाई, मधुकर, सरुबाई, संपत, लताबाई अशी सहा अपत्य त्यामधुन मुलींच्यातुन हीच मोठी असल्यामुळे एक भाऊ मोठा होता परंतु त्यावेळेस शेतकरी कुटुंब असल्याने व जिरायत शेती मुळे माहेरची परिस्थिती ही नाजुकच होती त्यामुळे मदत कोणाकडे मागायची हाच प्रश्न मोठा होता सासरकडील मंडळींकडून मदत घेण्याची म्हंटल तर ते पण किती दिवस मदत करतील हाच विचार मनात घर करून राहत असे.
या विचारातून सुचत गेले आणि तिने परिसरातील नागरिकांच्या असलेल्या अडचणी शोधुन जवळ साठवलेल्या चार पाचशे रूपयात बिडी सिगारेट लहान मुलांचा खाऊ कपड्यांचे अंघोळी करिता लागणारे साबण कडधान्य आणुन त्याची उसळ बनवणे मार्केट मधुन दैनंदिन लागणारे कोथिंबीर मिरची बटाटे तंबाटे यांचे राहत्या घरात दुकान चालु केले आणि त्यामधुन येणाऱ्या नफ्यातून भांडवल संभाळत आपला लहान लहान मुलांच्या खाण्याचा प्रश्न सोडवला व प्रपंच्याला उभारणी देण्याचे काम सुरु केले. हा प्रपंच सांभाळत संभाळत कोठेतरी घरात असलेली उणीव कमी करत असतानाच मुलांच्या डोक्यावर असलेले हे पितृछत्र हरपले तेव्हा या कुटुंबातील या पती पत्नीला असलेली वैशाली, सचिन, रुपाली , सुशील चार मुले वडिलांच्या वसंतराव यांच्या छत्रछाया पासुन पोरकी झाली* त्यावेळेस मोठी मुलगी साधारण दहा ते अकरा वर्षाची असेल त्यानंतरचा मुलगा सात आठ वर्षाचा असेल लहान मुलगी चार पाच वर्षाची असेल आणि सर्वात लहान मुलगा दोन तीन वर्षाचा असेल आता मात्र खरी अडचण सुरू झाली लहान लहान बालकांचे कसे संगोपन करावे कोणाचा आधार घ्यावा हेच सुचत नसलेली ही माता सदैव विचार करत असे *आपणास आपल्या कुटुंबातील इतर नातेवाईक मंडळींकडून माहेराहून आधार मिळेल काय आणि मिळाला तरी तो किती दिवस मिळेल याची चिंता या माऊलीला सतत भेडसावत असे कारण स्वता एका खेडेगावाच्या दुर असलेल्या शेतातील वस्तीवर जन्म घेतलेला असल्याकारणाने शिक्षणापासून वंचित राहिलेली ही माता एकाही अक्षराची ओळख नसलेली ही गृहिणी विचार करून करून बेचैन होत असे यामधुन कसा मार्ग काढावा दुकान तर आपले फारच लहान आहे यामधुन मुलांचे शिक्षण त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल याचा विचार रात्रभर झोप येऊ देत नव्हता.
आपल्या घरातील सदस्य माहेरकडील सदस्य यांच्या साहाय्याने काही मार्ग निघेल का कोण मला मदत करील काय हा विचार मनात सारखा येत होता. शेवटी निश्चय केला काही झाले तरी चालेल परंतु यापुढे कोणाकडे ही मदत न मागता काहीतरी घडवून दाखवायचे हाच निर्णय मनाशी ठरवून ठाम केला. दुकानात जास्तच लक्ष केंद्रित करून चिकाटी धरून आहे त्या भांडवलावर मुलांचे संगोपन तसेच दुकानात भांडवल वाढवत व पैसा पैसा बाजुला ठेवुन मुलांच्या शिक्षणा बरोबर त्यांचे पालनपोषण अगदी एकांद्या नोकरी करणार्या शिक्षणवाल्या व्यक्तीला लाजवेल अश्या पध्दतीनेच व मुलांना पण आपल्या पित्याची जरा पण आठवण येऊ दिली नाही हा ऐवढा मोठा त्याग ती विचार धारा खरोखर या माऊलीचे गुणगान किती गावे तेवढे कमीच आहेत. पुढे जशी जशी परिसरातील नागरिकांची वस्तु करीता मागणी वाढत गेली तसे तसे एक एक वाण (वस्तु) एक एक दोन दोन किलो दाळी तांदूळ ठेऊन दुकानदारी करत गेली आणि ती वाढतच गेली लहान लहान असलेली बालके मोठी होऊ लागली मोठी मुलगी बारावी तिचे शिक्षण झाले तिच्या नंतरचा मुलगा त्याची बारावी पर्यंत शिक्षण झाले त्याच्या नंतरची मुलगी तिचे ही दहावी पर्यंत शिक्षण झाले आणि सर्वात लहान मुलगा शिक्षणात हुशार निघाल्यामुळे तो mca झाला
मोठी मुलगी वयात आली नी तिचे लग्न झाले तिला पहिलीच मुलगी झाली आणि तिच्या सासुला मुलगा हवा होता म्हणून त्या झालेल्या मुलीला देखील पाहावयास पण कोणी आले नाही अश्या मनोविकाराच्या व्यक्ती मिळाल्या मुळे ती मुलगी आईकडेच आजपर्यंत राहिली आज त्यामुलीची ती मुलगी दहावी उत्तीर्ण होऊन पुढे शिक्षण नको म्हणून चार पाच वर्षापासून घरीच राहिली. मोठा मुलगा व्यवसाय करत आहे त्याला दोन मुले आहेत लहान मुलीला दोन मुले एकाची दहावी तर एकाची बारावी शिक्षण झालेले आहे तिच्या पतीचा फर्निचरचा व्यवसाय होता आज तिचे मुले तो व्यवसाय संभाळत आहेत कारण तिच्या ही पतीचे दोन तीन वर्षापूर्वीच निधन झाले आहे. आणि सर्वात लहान मुलाचा पण एक तीन वर्षाचा मुलगा आहे असा हा परिवार घडविण्यामध्ये कोणाचा आधार न घेता प्रत्येकाला स्वताच्या पायावर खंबीर पणाने उभे केलेले आहे या मातेने साथ देण्यास पती नसताना पण दोन मुली दोन मुले यांचे शिक्षण व लग्न करून दिले, पतीच्या निधनाचे दुख मोठ्या मुलीला मुलगी झाली म्हणुन घरीच राहिली समोरील व्यक्तींना जबाब विचारुन बोलायला कोणी पुरुष घरात नसल्यामुळे तिचे कायम टेंशन असे त्याबरोबर लहान मुलीचे व्यवस्थित सर्व असताना तिच्या अर्धा आयुष्यातुन तिच्या पतीचे ही निधन झाले हा पण मोठा आघात या माऊलीला झाला. संकटे तरी किती येतात आणि त्यामधुन काय काय सहन करावे लागत आहे हेच या माऊलीला सतत भेडसावत होते तरीही ती मनाला खंबीर करून तितकीच जबाबदार पणे या सर्व घडामोडींतील संकटाला सामोरी जात होती त्याच बरोबर सहन पण करत होती जबाबदारी पेलत पण होती. लहान मुलगा काॅम्पुटर इंजिनिअर झाला त्याला आयटी कंपनीत सुरूवातीलाच मुंबई मधुन जॉब मिळाला तो काही दिवस केल्यानंतर आता सध्या तो पुण्यात चांगले पॅकेज वरती जाॅब करत आहे त्यामुळे परिस्थिती यापुढे बदलत असतानाच हा अपघात तुझा कसा घडुन आला तुझे सुखाचे दिवस आलेले होते बसुन खाण्याचे दिवस तुझे आलेले असताना ते नियतीला मंजूर नव्हते असेच वाटत आहे. कशातून का होईना मला दोन रूपये कसे मिळतील याची जशी दुकानदारी करायला लागलीस तशी नेहमीच याची काळजी करणारी तु दुकानातून अजुन काही वेगळे देता येईल काय या विचारातून तु सामान खरेदी करण्यास पुण्याला केलीस सोमवार दिनांक 13/2/2023 रोजी ते खरेदी करून निघालीस आणि सहा वाजताची डायरेक्ट श्रीगोंदा बस असताना देखील पाच वाजताची सिध्दटेक मार्गाने कर्जत जाणारी बस पकडून थोडे उशिरा घरी जाण्यापेक्षा लवकर घरी जाईल या अपेक्षाने बस बदललीस खरी पण त्याच बसच्या आणि लवकर घर जवळ करायच्या नादात दौंडला ( नगरमोरी ) उतरून श्रीगोंदा जाणाऱ्या बस करिता अहमदनगर बारामती हायवे रोड क्रॉस करायला गेलीस आणि त्या भरधाव वेगात आलेल्या तेल वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने तुझ्या समोर हा महाकाळ घेऊन आलेला आहे याची पुसट अशी देखील कल्पना नसलेली तु तुझ्या डोक्यावर असलेला दुकानाचा माल घराच्या ओढीने टाकत असलेले प्रत्येक पाऊल तुला घराकडेच घेऊन जात आहे की तुला सर्वांच्या पासुन दुर कधीच नजरेस न पडण्याच्या वाटेने घेऊन जात आहे. कशी भुरळच घालणारी ती घटना घडली आणि तोच तो एक क्षण जीवनात आला आणि आमच्या सर्वांच्या पासुन दुरवर कायमचीच निघुन गेलीस.
आठवणी मात्र कायमच्याच लक्षात ठेऊन गेलीस तुझ्या आठवणीने प्रत्येक व्यक्तीचे हृदय अगदी धाय मोकलुन रडत असताना पाहावयास मिळत होते मग ती व्यक्ती तुझ्या माहेरची असेल किंवा सासरची पण ती रडतच होती माहेर तुझ श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी हे गाव असल्याने या गावचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय आयुष्यमान घनश्याम ( आण्णा ) शेलार यांनी दहन विधीच्या ठिकाणी दिनांक 14/2/2023 रोजी हजर होते त्यावेळी आण्णा श्रध्दांजली वाहत असताना स्वताच्या अश्रूंना आवर घालु शकले नाहीत कारण पण तसेच होते कोणत्याही अडचणीत स्वताच्या सख्या भावापेक्षा आण्णा कडुन ती अडचण सोडवत असे आण्णा पण आपल्या या पाठच्या बहिणी समान धरून ती सोडवणूक करून देत असत आणि हीच तर जीवनामधील खरी कमाई कालकथित गीताबाई वसंत पाटोळे यांनी केलेली पाहावयास मिळत होती एक तुझ व्यक्तीमत्व समोर येते अहोरात्र मेहनत करणारी मुलांच्या भविष्याचीच सदा काळजी करणारी माता सतत फक्त परिवारातील सदस्य यांच्याच बरोबर परिसरातील नागरिकांची पण काळजी करणारी एक तु माता तुझा एक नातु त्याच्या मम्मीला सारखा विचारपूस करत होता.
आईला काय झाले आहे ग मम्मी* *ती बरी आहे काय ग मम्मी तिचा अपघात झाला आहे असे म्हणतात तर माझ्या आईला किती लागले आहे ग मम्मी आईला खुपच वेदना होत असतील ना ग मम्मी *आपल्या आईला कधी घरी घेऊन येणार आहेत ग मम्मी *आईला कधी घरी आणणार आहेत सांग ना ग मम्मी *माझी आई कोठे आहे ग मम्मी *आईला माझ्या खुपच लागले असेल ना ग मम्मी *माझी आई एकटीच असेल ना मम्मी *तिच्या जवळ कोण असेल ग मम्मी *आईच्या हाताला लागले आहे तर खुपच दुखत असेल ना ग मम्मी *पप्पा अंकल आईजवळ आहेत काय ग मम्मी अशा अनेक प्रश्नांनी मम्मीला सतावून सोडत असलेला तुझाच लाडका नातु हर्ष ससाणेनगर सह श्रीगोंदा शहर परिसर व माहेरच्या हरएक व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द तुझ्या वर्तणूकीची सहवासाची साक्ष देत होते प्रत्येक व्यक्ती तुझ्या जाण्याने हळहळ व्यक्त करत होती. *हीच तर खरी तु कमावलेली इस्टेट निदर्शनास पडत होती यापेक्षा अधिक ती काय तुझ्यासाठी श्रध्दांजली असु शकते दसक्रिया विधी दिनांक 22/2/2023 सिध्देश्वर मंदिर श्रीगोंदा लेखन आयुष्यमान रेवन घोडके श्रीगोंदा 9822203602/8421879892 वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष