दौंड पोलीस स्टेशन येथे ४ युवकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,21-02-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २१ फेब्रुवारी २०२३ दौंड शहरातील युवकांनी दि १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा केला, याची चर्चा दुसऱ्या दिवशी रात्री ११:१५ वा सु. भावना हॉटेल येथे करत असताना युवकांच्यात ईगो निर्माण झाला. त्यातुनच जातिवाद उफाळुन आला दोघा चौघात वादविवाद होऊन हाणामारी झाली असल्याने दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी,आनंद लक्ष्मण सदाफुले, वय २३ वर्ष रा जनता माध्यमिक विद्यालय जवळ, (जात हिंदू महार) दौंड ता दौंड जिल्हा पुणे, यांने ४ इसमांन विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणी तक्रार केल्याने त्या अनुषंगाने, गु,र नं, 131/2023 भादवि क 323, 504, 34, अ जा ज .का क 3 (1) (r)(s) 3(2)(va) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या नुसार दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी १) ओंकार जगताप, २) हर्षवर्धन संजय जगताप, ३) संजय जगताप, ४) निखिल बागल सर्व रा.भावना हॉटेल शेजारी, दौंड ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 20/02/2023 रोजी रात्री 11/15 वा चे सुमारास फिर्यादी आनंद सदाफुले हॉटेल भावना येथे भाजी आणण्यासाठी गेला असता, त्याच्या ओळखीचा ओंकार जगताप हा हॉटेल मध्ये भेटला. त्या वेळी काल झालेल्या शिवजयंती वरुन चर्चा सुरु झाली, त्यावेळेस त्याचे सोबत असलेले त्याचे भाऊ हर्षवर्धन संजय जगताप, वडील संजय जगताप, आत्या भाऊ निखील बागल, हे हॉटेल मध्येच होते, ओंकार जगताप यास फिर्यादी म्हणाला आमची पण जयंती चांगली झाली.
असे म्हणताच हर्षवर्धन जगताप, जवळ येवुन म्हणाला की, तुमची पण जयंती चांगली होते म्हणजे काय? तुम्ही स्वताला काय समजता असे म्हणत तुम्ही आमच्या पुढे छाती करुन आमची बरोबरी करता काय ? तुम्ही खालच्या (जातीचे) आहे तिथेच राहणार असे म्हटल्यावर वादविवाद निर्माण झाला.तेथे उभा असलेला ओंकार जगताप, हर्षवर्धन जगताप त्यांचे वडील संजय जगताप व आत्या भाऊ निखील बागल, यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्यानी मारहान केली. तुम्हा महारांना सोडले नाही पाहिजे तुम्हाला आरक्षण खुप झाले आहे असे म्हणुन शिवीगाळ करत असताना घरातील लोक आले त्यांनी भांडणे सोडवा सोडवी केली फिर्यादी नातेवाईकांसह दौंड पोलीस स्टेशनला आला असता पोलीसांनी त्यांना सरकारी रुग्णालयातउपचार करण्यासाठी पाठवले . फिर्यादी महार जातीचा आहे हे माहीत अस्ताना नमुद लोकानी मला जाती वाचक शिवीगाळ करुन लाथा बुक्यानी मारहान केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
उपचार घेवुन दौंड पोलीस स्टेशनला येवुन 1) ओंकार जगताप 2 ) हर्षवर्धन संजय जगताप 3) संजय जगताप 4) निखील बागल सर्व रा भावना हॉटेल शेजारी दौंड ता दौंड जि पुणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर प्रकरणी दौंड विभागीय अधिकारी मा राहुल धस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार सपोनी गटकुळ पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी