जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रशासनाला 21 दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा रेल रोको- हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

By : Polticalface Team ,22-02-2023

जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रशासनाला 21 दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा रेल रोको- हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन करमाळा प्रतिनिधी आज मंगळवारी 21 तारखेला जेऊर येथील स्टेशन मास्तर यांना हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले यावेळी सर्व पक्षीय तसेच विविध संघटनाकडून रेल्वे प्रवासनाला निवदेन देण्यात आले. हुतात्मा एक्सप्रेसला येत्या 21 दिवसांत थांबा मिळाला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जेऊर परिसरातील नागरिकांनी या मोर्चाला प्रचंड मोठा पाठिंबा दिला विविध संघटनाकडून निवेदने सादर करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेऊरकरांचा अंत पाहत असून आता माघार नाही असा निर्धार काल जेऊर येथे बैठकीत करण्यात आला होता. दरम्यान आज जेऊर ग्रामपंचायत पासून रेल्वे स्टेशन पर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला. जेऊर मधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. करमाळा तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जेऊर रेल्वे स्टेशन येथे हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस थांबवण्यात यावी याबाबत युवा नेते पृथ्वीराज पाटील डॉक्टर सुभाष सुराणा सुहास सूर्यवंशी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर महिंद्र पाटील संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके एडवोकेट सविता शिंदे भाजपाचे नरेंद्र ठाकूर श्याम शिंदे तसेच अग्रवाल यांची भाषणे झाली यावेळी जेऊर येथील स्टेशन मास्तर नागेश निगुडकर व जयप्रकाश कुमार यांना निवेदन देण्यात आली चौकट घेणे हुतात्मा इंटरसिटी रेल्वे जेऊर येथे थांबविण्यात यावी यासाठी आजी-माजी आमदारा चे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याकडे साकडे जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी रेल्वे एक्सप्रेस थांबविण्यात यावी या मागणीचे निवेदन आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार शामलताई बागल युवा नेते रशमी बागल तसेच प्रहार संघटनेचे संदीप तळेकर यांनी हुतात्मा इंटरसिटी रेल्वे ला जेऊर येथे थांबा मिळावा अशा मागणीचे निवेदन वरिष्ठ रेल्वे प्रबंधकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी