By : Polticalface Team ,22-02-2023
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पाडला. गावच्या इतिहासात प्रथमच चार ते पाच तास मल्लांसाठी यात्रा कमिटीने वेळ वाढवून दिल्याने अनेक कुस्तीगीरांना गावचे आखाड्यात मोठी संधी देण्यात आली. याप्रसंगी विजेत्या मल्लांना मोठी विधागी देण्यात आली. त्यामुळे कुस्तीपटूंनी यात्रा कमिटीला धन्यवाद दिले. दरम्यान आखाड्यासाठी मैदानाचे स्वरूप यात्रा कमिटीने अत्यंत सुसज्ज करून लाल मातीची तटबंदी वापरण्यात आल्याने यंदा आखाडा देखील अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अखेरची कुस्ती ७५०० रुपयाची अंतिम कुस्ती पार पडली. आखाडे दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले खरेदी विक्री संघाचे संचालक नंदकुमार कोकाटे आदी नेत्यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी यात्रा कमिटीने या दोन्हीही मान्यवरांचा सत्कार केला.
दरम्यान सोमवार हा यात्रेचा तिसरा दिवस समजला जातो. या दिवशी सायंकाळी 9 ते रात्री 2 वाजेपर्यंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगलाताई बनसोडे यांचा लोकनाट्याचा बहुरंगी तमाशा पार पाडला. यावेळी यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या, पाळणे, मेवा, मिठाई थंड पेय व विविध व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या मोठा फायदा मिळाला. यात्रा कमिटीच्या अध्यक्ष म्हणून सरपंच शुभांगीताई जंगले, उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच अरविंद कुरुमकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व वाड्या वस्त्या गाव परिसरातील स्थानिक कार्यकर्ते हे सदस्य म्हणून कामकाज पाहत होते. धार्मिक विधी पार पाडण्यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञ सुधीर कुलकर्णी व मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव सौरभ गुरव यांनी भाविकांना सहकार्य केले. श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बडे, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल भांडवलकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला. होता कुठलाही अनुचित प्रकरणात घडता यात्रेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडले. वाचक क्रमांक :