वंडिलोपार्जित शेत जमीनसाठी सख्या भाऊ व भावजयी यांना जिवंत जाळून ठार मारल्या प्रकरणी आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा व एकुण १७००० / - रुपये दंड

By : Polticalface Team ,23-02-2023

वंडिलोपार्जित शेत जमीनसाठी सख्या भाऊ व भावजयी यांना जिवंत जाळून ठार मारल्या प्रकरणी आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा व एकुण १७००० / - रुपये दंड श्रीगोंदा : आरोपी नामे १. शदर मारुती भदे . २. रंजना शरद भदे रा . भदेमळा शेडगाव , ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर याने सख्या भावास व भावजयीस जिवंत जाळुन ठार मारल्या प्रकरणी श्रीगोंदा येथील मे . जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री . मुजीब एस . शेख साहेब यांनी भादवि कलम ३०२ अन्वये आरोपी यास दोषी धरले त्या नुसार ३०२ अन्वये जन्मठेप तसेच रक्कम रुपये ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महीने साथी कैदेची शिक्षा तसेच भा.द.वि. कलम ४३६ नुसार ५ वर्षे शिक्षा तसेच रक्कम रुपये ३००० / - दंड व दंड न भरल्यास २ महीने साधी कैदेची शिक्षा भा.द.वि. कलम ५०४ नुसार १ वर्ष शिक्षा भा.द.वि. कलम ५०६ नुसार १ वर्षे शिक्षा भा.द.वि. कलम २०१ नुसार ५ वर्षे शिक्षा तसेच रक्कम रुपये २००० / - दंड व दंड न भरल्यास १ महीने साधी कैदेची शिक्षा सुनावली .

घटणेची थोडक्यात हकिकत अशी आहे की , फिर्यादी मयत नामे गोरख मारुती भद वय ४१ वर्षे धंदा शेती व त्याची पत्नी सुरेखा गोरख भदे वय ३५ वर्षे दोन्ही रा . शेडगाव ता . श्रीगोंदा , जि . अहमदनगर यांचा व त्याचा सखा भाऊ शरद मारुती भदे यांचा वडिलोपार्जित शेत जेमीन कसण्याच्या कारणावरून वाद होता . घटने अगोदर दिनांक २६/०८/२०१ ९ रोजी सांयकाळी ०५ वजेचे सुमारास आरोपी नामे शरद मारुती भदे , रंजना शरद भदे , रुपेश शरद भदे यांनी लाईट केबल शेतात पडली या कारणावरुन सुरेखा गोरखा भदे हीस काठीणे मारहाण करुन तीचा विनय भंग केला होते व फिर्यादीस व साक्षीदार सुरेखा भदे हीस आरोपी यांनी तुम्ही नादी लागला तर तुमचे छप्पर पेटुन देऊन तुम्हाला जिवे ठार मारुन टाकु अशी धमकी दिली होती .

त्या बाबत सुरेखा भदे हीने श्रीगोंदा पोलीस स्टेशन दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी शरद भदे इतर २ यांचे विरुध्द गुन्हा र.न. ९ ० ९ / २०१ ९ भा.द.वि कलम ३५४.३२४,३२३,५०४,५०६.३४ अन्वये दिनांक २६/०८ / २०१ ९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यावरुन दिनांक २८/०८/२०१ ९ रोजी आरोपी नामे शरद मारुती भदे व इतर आरोपी यांनी संगनमत करुन मयत फिर्यादी गोरख मारुती भदे व त्याची पत्नी सुरेखा गोरख भदे हे शेडगाव येथे त्यांच्या छप्परात झोपलेले असतांना पहाटे ०५.०० वाजेचे सुमारास त्यांचे छप्पर बाहेर येउन आरोपीनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन तु घराच्या बाहेर ये तुम्हाला आता गुप्तीने मारुन टाकतो दार उघड असा मोठमोठ्याने आरडा ओरडा चालु होता . तु बाहेर आला नाही तर तुला घरासगट पेटुन देवू असे बोलून आरोपीने यातील मयत याच्या छप्परावर पेट्रोल टाकुन छप्पर पेटवून दिले . त्यात यातील मयत हे भाजु लागल्याने छप्पराचा दरवाजा उघडून बाहेर पडले असता शरद मारुती भदे यांनी गुप्तीने व लोखंडी टॉमीने मयत गोरख भदे यांच्या डोक्यावर व पाठीवर मारुन गंभीर दुखापत केली तसेच रजना भदे हिने मयत साक्षीदार सुरेखा भदे हिस काठीने मारहाण करुन इतर आरोपीने लाथा - बुक्याने मारहाण केली . वगैरे मजकुराचा जबाब हा दिनांक २८ / ०८ / २०१ ९ रोजी सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे घेतल्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन ग.र.न. ८१२ / २०१ ९ भा.द.वि. कलम ३०७,३२६ , वगैरे प्रमाणे आरोपी शरद मारुती भदे इतर ७ विरुध्द गुन्हा नोंदविला .

सदर गुन्हातील फिर्यादी मयत नामे गोरख मारुती भदे वय ४१ वर्षे याचेवर अहमदनगर येथे उपचार चालु असताना तो दिनांक १३ / ० ९ / २०१ ९ रोजी रात्री १० वाजेचे सुमारास उपचारा दरम्यान मयत झाले व साक्षीदार मयत नामे सुरेखा शरद भदे वय ३५ वर्षे हिचेवर पुणे येथे उपचार चालु असतांना त्या दिनांक १६ / ० ९ / २०१ ९ रोजी रोत्री ००.३० वाजता उपचारा दरम्यान मयत झाल्या होत्या . सदर गुन्ह्याचा तपास हा सपोनि सतिष हिरजी गावीत नेमणुक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी करून एकूण ०८ आरोपी विरुध्द मा . न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले . सदर खटल्याची सुनावणी मा . जिल्हा न्यायाधीश १ श्री . मुजीब . एस . शेख साहेब यांच्या न्यायालयात झाली . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण २१ साक्षीदार तपासण्यात आले . त्यामध्ये प्रत्यक्षदर्षी साक्षीदार , तहसीलदार साहेब , पोलीस पाटील , सरपंच वैद्यकीय अधिकरी , तपासी अधिकारी व पोलीस ठाणे अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील सौ . संगिता अनिल ढगे यांनी काम पाहिले २१ साक्षीदारांपैकी २ साक्षदारांची साक्ष सरकारी वकिल श्री . मंगेश दिवाणी यांनी तपासले . मा . न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील सौ सगिता ढगे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा . न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली . सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी एस . एस . फलके ब . नं . ३६१ , आशा खामकर ब . नं . १५३१ तसेच डी . के भंडालकर ब . नं . २७४ ९ यांनी सहकार्य केले आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.