एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीची आत्महत्या.
By : Polticalface Team ,23-02-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी
श्रीगोंदा शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत असलेली अल्पवयीन या विद्यार्थ्यांनीने दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
श्रीगोंदा शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी ही इंजिनिअरिंगच्या पाहिल्या वर्षात शिकत होती. श्रीगोंद्यातील एका नामांकित कॉलेजच्या पाठीमागील बाजूस मुलींचे वस्तीग्रह कॉम्प्लेक्स भाडे तत्त्वावर घेतलेले आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये मुलींसाठी खाजगी वस्तीगृह सुरू केलेले आहे. आज कॉलेजच्या वेळेत रूममधील सर्व मुली कॉलेजमध्ये गेल्या होत्या. ही एकटीच मुलगी रूममध्ये होती. तिने रूमचा दरवाजा आतून बंद केला. आणि दोरीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजचे प्राचार्य यांनी पोलीस स्टेशनला खबर देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व प्रेताची पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले हे करीत आहेत.
वाचक क्रमांक :