उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि मेहनत अंगी बाळगावी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख

By : Polticalface Team ,24-02-2023

उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि मेहनत अंगी बाळगावी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख लिंपणगाव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार, आत्मविश्वास व मेहनत अंगी बाळगावी, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी व्यक्त केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील बॅचचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर या होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री शेख पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे. नकळत शिक्षण घेत असताना मुलांकडून मुलांकडे पाहताना नकारात्मक बाबी समोर येतात. हा गुन्हा होऊ शकतो. शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे गुन्ह्याची नोंद होऊ नये. अन्यथा त्याचा नोकरी मिळवताना मोठा अडथळा निर्माण होतो. असे सांगून ते पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना आई-वडिलांकडून मुलांच्या मोठ्या अपेक्षा असतात. मुलींच्या बाबत सोळावे वर्ष धोक्याचे हे खरे आहे. चांगल्या किंवा वाईट मार्गाला जायचे असेल तर गेलेली वेळ सुटेल मात्र बाण माघारी घेता येत नाही. वेळ व प्रवाह हे जीवनात महत्त्वाचे आहेत. आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती बनण्यासाठी प्रामाणिकपणे वाटचाल केली पाहिजे. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, विद्यार्थी दशत आई-वडिलांना सुख देत नसाल तर मात्र दुःख देऊ नका. ध्येय निश्चित करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा. असे सांगून पुढील करिअर कामी विद्यार्थ्यांना न्या. शेख यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्त पाळावी, भरपूर अभ्यास करून आपले करिअर वाढवावे. शिक्षणामध्ये सर्व संधी मिळतात. मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. चांगले शिक्षण घेऊन डिगऱ्या मिळवा, मोठे व्हा, कौशल्य वाढवा. निश्चितच जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षित झाला पाहिजे हा दृष्टिकोन सहकार महर्षी आदरणीय शिवाजीराव नागवडे बापूंनी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खेडोपाडी ज्ञानाची गंगोत्री उभ्या केल्या. त्यामुळे ग्रामीण मुला-मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आपल्या गावामध्येच मिळाले. हे आपले सर्वांचे भाग्य आहे. असे सांगून त्यांनी विद्यालयाच्या कार्याचा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा चढता आलेख विशेद करत, विद्यालयाच्या जडणघडणीत गावच्या ग्रामस्थांचाही मोठा सहभाग लाभत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पुढील उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी कार्तिक जगताप, कुमारी प्रतीक्षा गायकवाड, आधी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आलेले अनुभव कथन केले. यावेळी अशोकराव आळेकर, शशिकांत एरंडे, शहाजी हिरवे खामकर सर आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब जगताप, प्रगतशील बागायतदार दीपक तारकुंडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके, माजी सभापती शहाजी हिरवे, शिवाजीराव ननवरे, संभाजी जगताप, शशिकांत एरंडे, छबुराव इथापे, खंडू आरू, रोहिदास सांगळे, सुभाष होले, श्रीमती जावळे पत्रकार दत्ताजी जगताप नंदकुमार कुरुमकर आदी- सह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक उपशिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले. सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोकराव आळेकर यांनी केले. आभार उपशिक्षक पांडुरंग बोडखे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.