By : Polticalface Team ,25-02-2023
घटना घडल्याचे समजताच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी भूषण पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती घेत, "आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास" दिला.. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क करून पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला..त्यानंतर रात्री गुन्हा दाखल झाला.. परिषदेने निषेधाचे पत्रक देखील काढले.. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे केली आहे..पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील घटनेचा निषेध केला आहे आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करमाळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश चिवटे तसेच त्यांच्या पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.. वाचक क्रमांक :