छत्रपती कॉलेजला पुणे विद्यापीठातून उत्कृष्ट महाविद्यालय मिळाल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
By : Polticalface Team ,27-02-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम करिअर कट्टा या अंतर्गत घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन स्पर्धा २०२२-२३ मध्ये श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार वितरण दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी के. जे.सोमैय्या महाविद्यालय,विद्याविहार ,मुंबई (स्वायत्त), या ठिकाणी पार पडल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कॉलेजच्या वतीने हा पुरस्कार प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी, जिल्हा समन्वयक प्रा.विलास सुद्रीक, प्रा. विजय इथापे , प्रा.प्रमोद परदेशी आणि प्रा.सतीश चोरमले यांनी स्वीकारला.सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार ही संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उद्योजक आपल्या दारी व आय.ए.एस. आपल्या दारी हे दोन प्रमुख उपक्रम राबविले जातात.यामध्ये भारतातील नामवंत आय.ए.एस. अधिकारी व उद्योजक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तसेच करिअर संदर्भात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण लेखी परीक्षेची तयारी, बँकिंग परीक्षेची तयारी, विद्यार्थी संवाद कार्यक्रम, आर्थिक साक्षरता कार्यशाळा, राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत सहभाग हे उपक्रम राबविले जातात.तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत कौशल्य वाढीसाठी नवीन कोर्सेस आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कॉलेजमध्ये सुसज्ज असे सेंटर फॉर एक्सलन्स सुरू केले जाणार आहे.यातून ५ विद्यार्थ्यांची बँकेत , ५ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात व ६ विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी मिळाली आहे.
या पुरस्काराचे वितरण मा.शैलेंद्र देवळाणकर,संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि मा. डॉ. नामदेव भोसले, उद्योजकता व कौशल्य विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, कर्नल डॉ.पिल्ले कुलगुरू सोमैय्या विद्यापीठ, ,मा. यशवंत शितोळे ,अध्यक्ष करिअर कट्टा,महाराष्ट्र राज्य, प्राचार्या डॉ.प्रज्ञा प्रभू , सोमैय्या कॉलेज यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा नागवडे, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सर्व संचालक, सौ. अनुराधाताई नागवडे, संस्थेचे सेक्रेटरी बापूतात्या नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी