करमाळा तालुक्याच्या आगामी राजकारणाचे किंग मेकर उस्मान शेठ तांबोळी हेच असतील मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे : पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर
By : Polticalface Team ,02-03-2023
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालूक्याच्या आगामी राजकारणाचे किंग मेकर उस्मानशेठ तांबोळी हेच असतील, मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे असे मत पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाजातील अग्रगण्य नेते व पुणे शहर काँग्रेस मधील सक्रिय पदाधिकारी उस्मानशेठ तांबोळी यांचा उद्या वाढदिवस आहे. परंतू त्याअगोदर आज माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी महत्वाचे राजकीय विधान केल्याने शहर व तालूक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर म्हणाले की करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाज हा विकासप्रिय असून मागील काही निवडणूकीत हा समाज माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. शिवसेनेची उमेदवारी असतानाही माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन तालूका विकासाला या समाजाने प्राधान्य दिले. करमाळा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम समाजास एकसंघ ठेवण्यासाठी तांबोळी बंधुनी बजावलेली भुमिका फार महत्त्वाची अशी आहे. आजही शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजास सत्तेच्या प्रवाहात आणून समाजाचा सर्वांगिण विकास व्हावा अशी सकारात्मक भूमिका माजी आमदार नारायण पाटील यांची असून करमाळा पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या समाजासाठी जेवढ्या शासनकृत विकासयोजना असतील त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रयत्न केले. आगामीकाळातही केवळ मुस्लिम नव्हे तर करमाळा तालुक्यातील अठरा पगड जातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाटील गटाकडून निरंतर नियोजन केले जाणार आहे. आज पर्यंत करमाळा तालुक्यातील सहकार क्षेत्रात मुस्लिम समाजास उमेदवारी दिली गेली नसल्याने आगामीकाळात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातही मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी संचालक म्हणून काम करताना बघायला मिळावा, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे प्रवक्ते तळेकर यांनी सांगितले. तर माजी आमदार नारायण पाटील हे सर्व समावेशक व लोकप्रिय नेतृत्व असल्याने आजही करमाळा तालुक्यातील सर्व सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.आगामी काळातील प्रत्येक निवडणुकीत पाटील गट विजयी होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वाचक क्रमांक :