जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे दिनांक चार मार्च ते आठ मार्च दरम्यान विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन: सौ ज्योतीताई नारायण पाटील यांची माहिती

By : Polticalface Team ,02-03-2023

जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे दिनांक चार मार्च ते आठ मार्च दरम्यान विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन:  सौ ज्योतीताई नारायण पाटील यांची माहिती करमाळा प्रतिनिधी जागतिक महिला दिन महोत्सव शनिवार पासून सुरू होत असून महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सौ. ज्योतीताई नारायण पाटील यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना सौ पाटील यांनी सांगितले की गेल्या वीस वर्षांपासून जेऊर ता. करमाळा येथे जागतिक महिला दिन हा विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा केला जातो. यामुळे ग्रामीण भागातील तसेच जेऊर शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न असतो. यंदा दिंनाक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असुन या दिनाचे औचित्य साधून दि 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यात शनिवारी दि 4 मार्च रोजी फनी गेम्स, उखाणे स्पर्धा व अनूभव कथन स्पर्धा होणार आहे तर रविवारी दि 5 मार्च रोजी रांगोळी, मेहंदी व हस्तकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवार दि 6 मार्च रोजी भारत महाविद्यालयाच्या वतीने महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी होणार आहे. मंगळवारी दि 7 मार्च रोजी डान्स व पाककला या स्पर्धा होतील. दि 8 मार्च रोजी महिलांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा काही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येणार असून यात माझे किचन सुंदर किचन, माझे घर सुंदर गार्डन तसेच महिलांनी व्हाटस्अॅप स्टेटस, इन्सटाग्राम व इतर सोशल मिडिया साठी तयार केलेल्या रिल्स, स्टेटस व्हिडिओ आदिंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडीओ अथवा रिल्स दि 4 ते 7 मार्च दरम्यान स्विकारले जाणार असून यातुनच विजेत्यांची नावे काढली जातील. वरील सर्व स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना दि 8 मार्च रोजीच्या बक्षिस वितरण सोहळ्यात आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले असून पहिल्या गटात इयत्ता आठवी ते पदवी पर्यंतच्या मुलींचा समावेश आहे तर दुसरा गट हा फक्त महिलांसाठीच राखीव असणार आहे. या सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी जास्तीत जास्तं संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ जोतीताई पाटील यांनी केले. यावेळी महिला दिन महोत्सव संयोजन समितीच्या सदस्या सौ अनिता जगताप, सौ रुक्मिणी कांडेकर, सौ जरिना मुल्ला, सौ मंगल गादिया, सौ रेणुका दोशी, सौ विजया भोसले, सौ जयश्री दळवी, सौ लता शिरस्कर, सौ यास्मीन शेख, सौ सुचीता राठोड, सौ प्रेमलता दोशी, सौ दोशी, सौ शालीनी नुस्ते, सौ धनश्री झांजुर्णे, सौ वैशाली कोठारी, सौ श्वेता गादिया, सौ अनिता लुणावत, सौ साधना लुणावत, सौ संगिता साळवे, सौ रत्नमाला बादल,श्रीमती विजया करणवर, आदिसह संयोजिका व परिक्षक उपस्थित होत्या. महिला दिनाच्या या स्पर्धा दिलेल्या तारखेनुसार आनंद पतसंस्था समागृह तसेच बाजारतळ सभागृह येथे वेळेत होणार आहेत. आ. नारायण पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. यंदाचे वर्ष 21 वे वर्ष आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.