दौंड तालुक्यातील मौजे स्वामी चिंचोली येथे शेतातील गोठ्यातुन शेळ्या व बोकडांची चोरी अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट
By : Polticalface Team ,03-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता.३ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस, कुरकुंभ, खडकी, मळद,रावणगाव या भागातील चोरीचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील लुटमारी करणाऱ्या अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. हॉटेल ढाब्यांवर जेवण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थांबतात मात्र फोर व्हीलर वाहनाच्या काचा फोडुन किमती वस्तू चोरीचे अनेक प्रकार व गुन्हे घडले असुन दौंड पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. आता अज्ञात चोरट्यांनी चोरीची दिशा बदलली आहे, सर्व सामान्य शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येते आहे.
दौंड तालुक्यातील मौजे स्वामी चिंचोली येथिल शेतातील गोठ्यामधुन शेळ्या व बोकडांच्या चोरीने परीसरात खळबळ उडाली आहे, मौजे स्वामी चिंचोली येथिल शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यामधुन उस्मानाबादी जातीच्या शेळ्या व बोकड पिंल्लांनसहित रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
त्या अनुषंगाने फिर्यादी परशुराम तुळशीराम होले, रा स्वामी चिंचोली होले वस्ती, ता दौंड जिल्हा पुणे, यांनी अज्ञात चोरट्यांन विरुद्ध दि,२/३/ २०२३ रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना दि,१/३/ २०२३ रोजी रात्री ८ ते स,६ दरम्यान मौजे स्वामी चिंचोली गावचे हद्दीत फिर्यादी यांच्या शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे, यामध्ये ३६ हजार-रु. किंमतीच्या चार शेळ्या पाच वर्षे वयाच्या तांबूस काळे रंगाच्या उस्मानाबाद जातीच्या प्रत्येकी ९ हज़ार रुपये किंमतीच्या तसेच ४४ हजार-रु. किमतीचे बोकड जातीचे दोन वर्ष वयाचे दोन तांबुस रंगाचे व चार काळे रंगाचे उस्मानाबाद जातीचे व १४ हजार किंमतीच्या दरातील सात शेळ्याची पिल्ले असे एकूण ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी रात्रीच्या वेळी शेळ्या व बोकड पिल्ले, दि, १/२/२०२३ रोजी रात्री मौजे स्वामी चिंचोली गावचे हद्दीतील फिर्यादी यांच्या शेतातील गोठ्यातुन अज्ञात चोरांनी चोरुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असल्याने अज्ञात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल-पोसई गोसावी तपास सहा पोलीस फौजदार कुंभार पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी