पुणे भिम छावा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कॅन्टोन्मेंट कॅम्पमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
By : Polticalface Team ,05-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ०५ मार्च २०२३, पुणे शहरातील भिम छावा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कॅन्टोन्मेंट कॅम्प वार्ड क्र ४ मधिल, न्यू मोदीखाना गोल हौद जवळ कॅम्प पुणे येथे दि, ८ मार्च २०२३ रोजी परीसरातील सर्व सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार असल्याचे भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शामराव गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे कँटोन्मेंट कॅम्प भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शामराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक व जनसेवक अमित नारायण मोरे, यांनी महिला वर्गांला अपेक्षित असलेला सांस्कृतिक होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा निर्माता व सादरकर्ते महाराष्ट्राचा सुपरस्टार गणेश (भाऊजी) रणदिवे यांच्या उपस्थितीत अप्रतिम व उत्कृष्ट कॉमेडी सादरीकरण महिला दिनाच्या निमित्ताने होणार आहे, यामध्ये सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील महिलांच्या सांस्कृतिक खेळामध्ये संगीत खुर्ची मनोरंजन उखाणे तसेच स्नेही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या ५ विजेता महिला गृहिणींना उत्कृष्ट बक्षीस देण्यात येणार असून, त्यामध्ये प्रथम बक्षीस १) रेफिजरेटर, २)मायक्रो ओव्हन, ३)कुलर ४) इलेक्ट्रिक इंडेक्शन, ५) मिक्सर, तसेच इतर सहभागी महिलांना साडी वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जागतिक महिला दिन देश व राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, राजमाता जिजाऊ माँ साहेब, शिक्षणाचे महत्त्व प्राप्त करून देणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गृहिणींनी घरगुती बचत व व्यवस्थापन कसे करावे. त्यागमूर्ती माय रमाई आंबेडकर याचा आदर्श समोर ठेवून वर्तमान काळातील महिलांनी आपली प्रगती साधण्यासाठी दूरदृष्टी ठेवावी असा संदेश मनी ठेऊन जागतिक महिला दिन साजरा करावा तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीत महिला संरक्षण अधिनियमित करुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समान संधी उपलब्ध करून दिली अशी प्रतिक्रिया भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शामराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी