खुटबाव येथिल ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील सोन्या चांदीच्या मूर्तीची चोरी, १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला
By : Polticalface Team ,06-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०५ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील मौजे खुटबाव ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील चौकटीला लावलेली चांदीची महिरप, चांदीचा देखावा, गणपतीची मूर्ती त्यावर सोन्याचा गुलामा केलेला, नागाची मूर्ती त्यावर सोन्याचा गुलामा केलेला, अशी एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या वस्तू, शनिवार दि,०४ मार्च रोजी पाहटे ५:३२ वा सु अज्ञात चोरट्यांनी मंदिरात दरोडा घातल्याने खुटबाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे, सदर दरोडा प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे श्री काळभैरवनाथ मंदिराचे पुजारी गोकुळ थोरात यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुटबाव येथिल पुजारी गोकुळ थोरात दररोज प्रमाणे मंदीरातचे दरवाजे उघडण्या करीता गेले असता मंदीराच्या बाहेरील दरवाजाची कडी कोयंडा तुटलेला त्यांना दिसुन आला असल्याने त्यांनी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नानासाो मुरलीधर थोरात यांना फोन करून मंदीरात बोलावले, दोघे मंदीराच्या गाभाऱ्यामध्ये जावुन पाहीले असता, गाभा-याच्या बाहेरील चौकटीला महीरपी असणारा २५ हजार रुपये किमतीचा चांदीचा देखावा, उचकटुन काढुन नेलेला दिसुन आला, तसेच ४० हजार रुपये किमतीचा आतील वरच्या बाजुस महीरपी केलेले चांदीचे देखावा, व गाभा-याच्या चौकटीला असलेल्या २५ हजार रुपये किमतीचा चांदीचे गणपती मुर्ती त्यावर सोन्याचा मुलामा असलेल्या २५ हजार रुपये किंमतीची वस्तू, देवाच्या मागे असणारी चांदीचा २५ हजार रुपये किमतीचा त्यावर मुलामा केलेल्या नागाची मुर्ती आणि गाभाऱ्याच्या आतील दानपेटीचे कुलुप तुटलेले दिसुन आले त्यावरून त्यांची खात्री झाली, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कडी कोंयंडा तोडून गाभाऱ्याच्या आतील चांदी सोन्याचे मुलामा असलेल्या गणपती व नागाची मूर्ती असे एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या चांदी सोन्याच्या मुलामा केलेल्या वस्तूंनवर अज्ञात चोरांनी दरोडा घातला असल्याचे दिसून आले
खुटबाव येथिल काळभैरवनाथ मंदिराचे पुजारी गोकुळ थोरात यांनी यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करताच पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व स्वान पथकाच्या साह्याने तपास कामी यंत्रणा सुरू केली आहे, यवत पोलीस प्रशासनाने खुटबाव येथिल पुजारी व ग्रामस्थ यांच्याकडे सदर प्रकरणी चौकशी केली, या प्रसंगी खुटबाव येथिल सरपंच शिवाजी चव्हाण तसेच समस्त ग्रामस्थ यांनी सदर चोरीतील आरोपींना शोधुन अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पो ना मडडी तर पुढील तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, करीत आहेत,
सदर मंदिरातील चोरी संदर्भात खुटबाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ भयभित झाले असुन शांतता पसरली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.