ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; फडणवीसांकडून शिंदेना बळ
By : Polticalface Team ,06-03-2023
मुंबई : शिवसेना शिंदे गटाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यानंतर आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे हवा होता, असंही स्मिता ठाकरे यांनी म्हटलंय.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात स्मिता ठाकरे बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आणि शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आलाय. या कार्यक्रमात स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय.
यावेळी स्मिता ठाकरे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री आहेत. ते सतत काम करत असतात, झोप, वेळ काळ काही नाही, फक्त काम त्यांच्या डोक्यात असतं. ते फक्त तीन तास झोपतात. त्यांचा दिवस इतक्या लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो. त्यांच्या कामात गती आहे, त्यामुळं ते सर्वांचे लाडके मुख्यमंत्री झालेत.
उद्धव ठाकरेंना टोला लगावत स्मिता ठाकरे म्हणाल्या, शिंदे एवढे उपक्रम हाती घेतात, महिलांसाठी काम करतात, बाल विकासासाठी कामं करतात. ही काय खायची गोष्ट नाही. त्याला फक्त एक आवड लागते. एकनाथ शिंदेंना आम्ही खूप वर्षांपासून ओळखतो. हे त्यावेळचे एकनाथ शिंदे जेव्हा ते साहेबांचे शिलेदार म्हणून ओळखले जायचे.
त्यांनी आज बारा बाय बाराच्या खोलीतून वर्षावरचा जो प्रवास आहे, तो काही साधा नाही. त्यामागे काही खडतर प्रयत्न आहे, त्यामुळं ते आज या खुर्चीवर आहेत. आम्हाला असाच मुख्यमंत्री हवा होता. नुसतं वारसदार, वारसदार करुन चालत नाही. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण? असाही सवाल स्मिता ठाकरे यांनी यावेळी केलाय
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी