By : Polticalface Team ,06-03-2023
आपल्या भागातील साकळाई योजना त्याच्यावर आत्ताचे,सर्वेक्षणनामा राजकारण व कृती समितीचा मेळावा मिटींग चालू आहे. खरे तर साकळाई योजनेचा पाठपुरावा १९९२ ला केला गेला होता. त्याचा सर्व्हे हा १९९७ ला झाला होता. त्यावेळी ही योजना १२८ कोटींची होती.साकळाई योजना हा शब्द खऱ्या अर्थाने घनश्याम आण्णा शेलार यांनी आणला होता. मी कोणाचा कार्यकर्ता आहे म्हणून मी हे बोलत नाही. मुळातच मी आपल्या भागात राहणारा सामान्य नागरिक आहे साकळाई योजना जेवढी शेतकऱ्यांना हवी आहे तेवढीच ती मलाही हवी आहे.आज नगर तालुक्यांचे राजकारण पाहता माझ्या हे लक्षात आले की साकळाई योजना ही कोणाच्या लढा देण्यामुळे झाली.कारण १९९५ ला घनश्याम शेलार हे विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील कुकडीचे पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळवून दिले. साकळाई योजनेवर काहींनी आजपर्यंत राजकारण केले आणि लोकांच्या भावना तीव्र झाल्या की काही साकळाई योजनेचे राजकारण करू पाहत आहेत. मुळातच साकळाई योजनेला विरोधच त्यांचा आहे.कारण हे श्रेय विरोधी राजकीय पक्षांना जाऊ नये म्हणून त्या योजनेला आत्तापर्यंत विरोध झाला. शेवटी हे राजकारण आहे.मला त्यात पडायचे नाही.आज आपल्या भागातील बरेचसे नेते त्यांच्या बाजूने आपल्याला भ्रमित करतीलच पण मी सांगतो हा खूप मोठा संघर्ष आहे,त्यासाठी अनेकांनी नगर ते मुंबई मंत्रालय येथे पायी मोर्चा, उपोषण, रास्ता रोको वगैरे मार्गाने प्रयत्न केला होता.तसेच या योजनेसाठी २००२ मध्ये २५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. पण राजकीय अनास्थेपोटी या फायली वरची धूळ पण उठली नाही.अन् परिणामी हा भाग दुष्काळात भाजत राहिला.
२०१५ मधील अधिवेशनात श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी साकळाई योजनेचा प्रश्न विचारला होता. त्यावर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लेखी उत्तर दिले होते. त्यामध्ये म्हटले होते की, कुकडी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन पूर्वीच झालेले आहे. आता पाणी उपलब्ध नसल्याने ही योजना कार्यान्वित करता येणार नाही.योजनेची यशस्वीतेकडे वाटचाल होताना दिसत नसल्याने गेल्या अनेक वर्षापासुन जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली साकळाई योजनेच्या कृती समितीने आंदोलनाला सुरुवात केली,नगर-सोलापुर आणि नगर-दौंड रस्त्यावर दोन मोठी आंदोलने झाली,यामध्ये खासदार सुजय दादा विखे,आमदार बबनराव पाचपुते,अ.नगर जि.प.चे मा.अर्थ व बांधकाम समिती सभापती तसेच मा.जिल्हा परिषद सदस्य श्री बाळासाहेब हराळ पा.,जलसंपदा खात्यातील माजी स्थापत्य अभियंता व सामाजिक कार्यकर्ते विजय सावळे राम तथा बाळासाहेब बोठे पा. मा.आमदार राहुल दादा जगताप, घनश्याम शेलार, दिपाली ताई भोसले,भापकर गुरुजी,रामदास झेंडे(सर),बाबा महाराज झेंडे,संतोष लगड,झुंबर बोरुडे साहेब,सामाजिक कार्यकर्ते,नेतेमंडळी यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून घसा कोरडा होईपर्यंत भाषणे केली,साकळाई कोणत्याच पक्षाचा आणि पार्टीचा मुद्दा नाही हा लढा सामान्य शेतकऱ्यांसाठी आहे असे ठणकावून सांगण्यात आले. साकळाई प्रश्नासाठी या भागात कधीच एवढे मोठे आंदोलन झाले नव्हते इतके मोठे आंदोलन नगर-दौंड रोडवर चिखली या ठिकाणी तर नगर-सोलापुर रोडवर रुईछत्तिशी येथे झाले,जनतेचा मोठा आक्रोश पहायला मिळाला,जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे मोर्चा नेण्यात आला,खूप शेतकरी आणि जनता या मोर्चात सहभागी झाली होती तरी तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारला जाग आली नाही,यानंतर या भागातील शेतकऱ्यांचा आंदोलनांचा जोर वाढला.त्यातून योजनेच्या फेरसर्वेक्षणाची मागणी पुढे आली.तोपर्यंत लोकसभेची निवडणूक येऊन ठेपल्याने संभाव्य उमेदवारांनी यात लक्ष घातले.मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळे भेटली.त्यानतंर पुन्हा हा मुद्दा निवडणूक प्रचारातही चर्चेत आला. राज्य सरकारने मंजुरी दिली आणि निधी नसेल तर केंद्र सरकारकडून तो आणता येईल, असा दावाही केला गेला.मात्र, पाण्याची उपलब्धता कशी करता येईल यावर मात्र कोणीही खात्रीशीर बोलले नाही. त्यामुळे निधी मिळून योजना झाली तरी त्यातून खात्रीशीरपणे पाणी मिळणार की अन्य काही योजनांप्रमाणे साकळाई जलसिंचन योजना पाण्याअभावी अडचणीत येणार की काय? याची नेमकी माहिती सविस्तर पणे मांडलीच जात नव्हती.
खासदारकीच्या निवडणूकीत सुजय विखे यांनी साकळाई योजना मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले होते तर त्यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखे यांना निवडून द्या,विधानसभेच्या निवडणुकीच्या आत साकळाई योजना मार्गी लावली जाईल असे आश्वासन दिले होते,परंतू त्यानंतर कोणतीही कार्यवाही साकळाई योजनेवर झाली नाही,देवेंद्र फडणवीस यांनी जनमताचा आदर केला नाही,त्यांना झुलवत ठेवलं असा जनतेचा सुर सुरू झाला.दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असलेले नगर-पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांना साकळाई कृती समिती भेटली असताना त्यांनी आम्हाला फक्त तीन महीने दया,आम्ही योजना मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते.पण कारवाई काहीच झाली नाही.
यानंतर लगेच साकळाई योजनेबाबत दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी मुंबई येथे साकळाई योजनेबाबत जलसंपदा मंत्री मा.गिरीष महाजन,गृहनिर्माण मंत्री मा.राधाकृष्ण विखे पा.,पालकमंत्री मा.राम शिंदे,मा.मंत्री बबनराव पाचपुते,आमदार राहुल जगताप,अ.नगर जि.प.चे मा.अर्थ व बांधकाम समिती सभापती तसेच मा.जिल्हा परिषद सदस्य श्री बाळासाहेब हराळ पा.यांच्या समवेत बैठक पार पडली बैठकीत सकारात्मक चर्चा झाली व म.राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.राधाकृष्ण विखे साहेबांनी साकळाई योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले याबाबत साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी खासदार डॉ. सुजय विखे प्रयत्न करत होते.सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी प्रयत्न करून साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी आणली होती.पण पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची अट असल्यामुळे सर्व्हेक्षणास सुरुवात होत नव्हती. ती अट वगळून नव्याने साकळाई सर्व्हेक्षणाचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत.तसेच सर्व्हेक्षणासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. *"तुमची इच्छाशक्ती तुमचा विकास"* वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष