By : Polticalface Team ,08-03-2023
                           
              
महाराष्ट्र बजेट  : राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात  चांगलाच गाजला.  अवकाळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले या कारणासाठी शेतकऱ्यांच्या  मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी विरोधकांनी  लावून धरली. आज फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहे . गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मेंढ्या, पाळीव प्राणीही दगावले आहेत . नुकसान पाहून शेतकरी स्वतःलाच मारून घेत आहे. दुसरीकडे पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
राज्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील पिके वाया गेलेली आहेत. कांदा, कापूस, मका, हरभरा, गहू अशा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या असून . आणखीही काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला. त्याच्या संसाराची होळी झाली आहे. आणि इकडे नेते रंग उधळत आहे असा टोला छगन भुजबळ यांनी लावत गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही अनुदानाच्या बाबत निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी गुजरातच्या सरकारचा संदर्भ त्यांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पण या मुद्द्यावर सरकारला घेरले. त्यानंतर याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली. यापेक्षा जास्त महत्वाचे दुसरे काही असूच शकत नाही असे स्पष्ट करत त्यांनी ही मागणी लावून धरली. पण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे जयंत पाटील संतप्त झाले. आम्हाला जर बोलूच दिले जात नसेल तर काय उपयोग, असा सवाल करत त्यांनी सभात्याग केला वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष