By : Polticalface Team ,08-03-2023
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावाची ७ हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. या गावात जवळपास २०० जावई राहतात. मात्र, धुलिवंदन सणाच्या दिवशी अनोख्या परंपरेमुळे ते सर्व जण भूमिगत झाले आहे. विडा गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी मंदिर आहे. या गावामध्ये मध्ययुगीन संस्कृतीची परंपरा जोपासली जात आहे. दरवर्षी धुलीवंदन सणाला जावयांची वाजत-गाजत गावातून गाढवावर बसून मिरवणूक काढली जात असून जवळपास १०० शंभर वर्षांपासून विडा गावाने ही परंपरा जपली आहे.
धुळवडीच्या दोन दिवस अगोदर प्रत्येक वर्षी गावातील तरुणांचे पथक स्थापन करून जावई शोध समिती नेमली जाते. जावयांना या समितीच्या निगराणीखाली ठेवले जाते . तर प्रत्यक्ष धुळवडीच्या दिवशी या जावयांना सकाळी ग्रामपंचायत समोर चपलेचा हार घालून गाढवावर बसवून दुपारपर्यंत रस्त्यावरून मिरवणूक काढली जाते. दुपारी हनुमान मंदिर येथे लोकवर्गणीतून जमलेल्या पैशातून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर या जावयांना केला जातो. तसेच सासऱ्याकडून सोन्याची आंगठी भेट दिली जात आहे वाचक क्रमांक :