स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत क्रांती घडविली- प्राचार्य दत्तात्रय सस्ते

By : Polticalface Team ,08-03-2023

स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत क्रांती घडविली- प्राचार्य दत्तात्रय सस्ते लिंपणगाव (प्रतिनिधी)- भारतीय स्त्रियांनी संपूर्ण जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात भारतीय संस्कृतीचे जतन करत आपले अस्तित्व निर्माण केले, त्यामुळे आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे गौरवद्गगार प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व जूनियर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैशालीताई काकडे ह्या होत्या.

व्यासपीठावर ज्योतीताई काकडे, मनीषाताई काकडे, कुसुम काकडे, निशा लाटे, संध्याताई काकडे, सुमन काकडे, शकुंतला लगड, रूपालीताई काकडे, सुवर्णा जठार आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य सस्ते पुढे म्हणाले की, भारतीय स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात धाडसाने सहभाग घेऊन नेत्र दीपक कामगिरी बजावली प्रामुख्याने सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी, चांदबिबी, झाशीची राणी, इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज इत्यादी कर्तबगार महिलांचा देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभले. त्यानंतर आजही महिला विविध क्षेत्रात सहभाग घेऊन उच्चपदस्थ अधिकारी बनले ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून प्राचार्य सस्ते यांनी व्यसनमुक्तीवर भरीव असे मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रामुख्याने सौ उर्मिला जठार यांनी स्त्रीने संधी मिळेल तेव्हा आपलं मनोगत व्यक्त करावं स्त्रियांनी उच्च स्वप्ने पहावीत.

सौ छायाताई भोसले यांनी स्त्रियांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे सांगितले.

सौ मनीषाताई काकडे यांनी विद्यार्थिनींना मदत करण्याचे आवाहन करत स्त्रिया इतिहास घडवतात असे सांगितले.

सौ अलका साळवे यांनी समाजाकडून संविधानाकडून आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा उपयोग करावा महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक असून, आहाराचे महत्व सांगितले.

सौ शकुंतला लगड माजी ग्रामपंचायत सदस्या यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, स्त्रि व पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. महिलांनी समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करावा विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी द्यावी.

सौ मीना नगरे यांनी स्त्रि जीवनावर एक भावनिक कविता सादर केली.

याप्रसंगी राष्ट्रीय कुस्तीपटू अक्षदा भंडारी व सोनाली मंडलिक यांचाही विद्यालयाच्या वतीने नागरिक सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने मनोगत व्यक्त करत शालेय विद्यार्थ्यांनी सतत खेळात सहभाग घेऊन आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे जिद्द व चिकाटी अंगी असेल तर प्रतिकूल परिस्थिती आड येत नाही खेळाच्या माध्यमातून राज्य व देशाचे नाव अजरामर ठेवावे असे सांगून, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी सौ संध्याताई काकडे यांनी कुस्तीपटू सोनाली मंडलिक या कुस्तीपटूच्या पुढील कारकीर्दीसाठी अकराशे रुपये रोख देऊन सन्मान केला.

या भव्य जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थी महिला भगिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक विद्यालयाच्या विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती नौशाद शेख यांनी केले. सूत्रसंचालन करत आभार जुनिअर कॉलेजच्या प्रा. पुष्पलता काकडे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष