ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो इंडिया महिला फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महिला प्रबोधन मेळावा

By : Polticalface Team ,09-03-2023

ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो इंडिया महिला फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महिला प्रबोधन मेळावा श्रीगोंदा : आठ मार्च 2023 रोजी अकरा वाजता टाकळी कडेवाडी बैरागी बाबा मंदिरात हा महिला प्रबोधन मेळावा होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रणवती माई राहुल दादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालू करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अध्यक्ष निवड आरोग्य सेविका मंगल शेळके यांनी केले तर अनुमोदन ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे महिला सक्षमीकरणाचे टीम लीडर पल्लवी शेलार यांनी केले.तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून पुढील कार्यक्रम चालू करण्यात आला . यावेळी प्रणोती माई जागतप यांनी महिलांना वैयक्तिक आरोग्य तपासणी नियमित करून घ्यावी तसेच चूल व मूल या शिदोरीत न राहता आपले जीवन आनंदमय सुखमय कसे होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच नाही तहसीलदार प्रगती कट्टे मॅडम यांनी शासनाच्या तहसील कार्यालयाच्या विभागातील सर्व योजनांची माहिती दिली आणि मुलींसाठी शिक्षणासाठी चे मार्गदर्शन केले. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते मीराताई शिंदे यांनी महिलांचा ८ मार्च महिला जागतिक दिन का साजरा केला जातो याचे महिलांना माहिती दिली व महिलांना चूल आणि मुल सोडून घराबाहेर पडल्यानंतर महिला चे हक्क अधिकार समजतात ते मीराताई शिंदे यांनी सांगितले. तसेच डॉक्टर त्रिषाला विधाते मॅडम यांनी महिलांना बीपी शुगर एच बी तपासणी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळी व स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर महिलांसोबत मार्गदर्शन केले. तसेच टाकळी कडे वळीत गावचे उपसरपंच डॉक्टर सुभाष देशमुख यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आठ मार्च महिला जागतिक दिनाच्या व आरोग्य बाबतची माहिती दिली व महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मंगल शेळके आरोग्य सेविका प्रा आ केंद्र आढळगाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आरोग्य विषयी विविध योजनांची माहिती दिली. तसेच कुसळकर मॅडम यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प मधील सर्व योजनांची माहिती महिलांना दिली व आहाराविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप सरपंच रूपाली इथापे मॅडम यांनी केला. तर आभार प्रदर्शन ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे सीआरसी रोहिणी राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सुनीता चौबे, कविता जाधव, जया वाळुंज, वाळुंज सुवर्ण, सोनवणे वैशाली, वाळुंज राणी, नवले सुनिता, शिर्के मीना, सुपेकर वैशाली, वाळुंज मीरा, सोनवणे रेखा, वाळुंज छाया, भुजबळ शारदा, चव्हाण वैशाली, वाळुंज पल्लवी शेलार, लता सावंत, उज्वला मदने, रोहिणी राऊत, सुनीता बनकर, सारिका गोंडे, संतोष भोसले, मीना मोहिते, कविता सिदनकर, मंगल धेंडे, गिरजा घोडेकर व महिला भगिणी आठ मार्च महिला जागतिक दिनासाठी उपस्थितीत होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी