पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेशकुमार राऊत यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

By : Polticalface Team ,09-03-2023

पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेशकुमार राऊत यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेशकुमार राऊत यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव श्रीगोंदा प्रतिनिधी- आपल्या वेगळ्या कार्यशैलीने शिरूर तालुक्यात पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम करणारे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्जतचे भूमिपुत्र सुरेशकुमार नानासाहेब राऊत यांना पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अहमदनगर येथील माऊली संकुल येथे आयोजित कार्यक्रमात सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई जानकी नानासाहेब राऊत, सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, विविध महिला संघटनांना मार्गदर्शन करणाऱ्या उद्योजिका साठे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. यंदा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध सरपंच व उल्लेखनीय कार्य करणारे पुरस्कार्थी उपस्थित होत्या. यामध्ये शिरूर पोलीस स्टेशनचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कठीण गुन्ह्यांची उकल करून शिरूर तालुक्यात पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम आपल्या वेगळ्या कार्यशैलीने करून दाखवले आहे. केंद्रीय गृहखात्याने ही त्यांच्या या कार्याची दखल घेतली असून त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले असून लवकरच प्रदान केले जाणार आहे. तसेच राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते “लोकशाही पुणेरत्न” या पुरस्काराने ही त्यांना सन्मानित करण्यात आले. रांजणगाव गणपती येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस स्टेशनला हायटेक करून आयएसओ मानांकन मिळवून देऊन, अनेक कठीण गुन्ह्यांची उकल करून पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली होती. त्याबद्दल ही त्यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. सतत वेगवान कामगिरी करत शिरूर तालुक्यात नावलौकिक मिळालेले शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस निरीक्षक हे कर्जतचे भूमिपुत्र असून एका सुसंस्कारित कुटुंबातुन पुढे आलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे वडील नानासाहेब राऊत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशकुमार चालवत आहेत. कर्जतच्या विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यात राऊत कुटुंबीय सातत्याने अग्रेसर राहून सामाजिक बांधिलकी जोपासत असते. त्यांचे लहान भाऊ रवींद्र राऊत व भावजय दोघेही प्राथमिक शिक्षक असून तेही सातत्याने विविध सामाजिक संघटनांशी संबंधित राहून कार्यरत असतात. सुरेशकुमार यांची पत्नी सौ. स्वाती या पुणे महानगरपालिकेत प्राथमिक शिक्षिका आहेत व ज्येष्ठ कन्या दंतरोग तज्ज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण (एम डी एस) पुणे येथे घेत असून चिरंजीव अमेरिकेत अभियांत्रिकी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण (एम एस) घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत परिवार सामाजिक जाण नि भान ठेवून जीवनाची वाटचाल करीत असून कर्जतच्या या भूमीपुत्राचा तमाम कर्जतकरांना रास्त अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही.
कोरोना काळात सर्व जग एकाजागी स्तब्ध झाले असताना जीव धोक्यात घालून लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणाऱ्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या कार्यावर गौतम कोतवाल लिखित समर-लढा कोरोना विरुद्धचा ! या पुस्तकात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या कोरोना काळातील कार्यावर सविस्तर आलेला एक स्वतंत्र लेख ही या भूमीपुत्राच्या कार्याची पोचपावती आहे .


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष