करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी वेळेवर उपस्थितीत रहात नसल्याने रुगणांचे हाल!
By : Polticalface Team ,09-03-2023
करमाळा प्रतिनिधी
खासगी दवाखान्यात उपचार घेणे परवडत नसलेले ग्रामीण भागातील अनेक रुग्ण सरकारी दवाखान्यात उपचार होतील या आशेने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात येत असतात मात्र कर्तव्यावर असलेले डाॅक्टर, औषधनिर्माता विभागातील कर्मचारी निर्धारित वेळेपेक्षा अर्धा / अर्धा तास उशीरा येत असल्याने आजारी रुग्णांन अक्षरशः रांगेत ताटकळत उभा राहून वैतागुण जात आहेत. विशेष म्हणजे पंधरा मिनेटे अर्धा तास उशीरापर्यंत येणारे कर्मचारी सुट्टी मात्र अगदी वेळेवर करत आहेत. पाच मिनिटे जरी केसपेपर काढण्यास उशीर झाला तरी रुग्णांना गोळ्या औषधं दिली जात नाहीत.
रुग्णांची गर्दी झाल्यानंतर त्याना डिग्री लावून तपासण्या ऐवजी इंजेक्शन शिवाय फक्त गोळ्या औषांधावर बोळवण केली जात आहे अवश्य उपारांऐवजी पुन्हा रुग्णांवर खेकसेणे ओरडणे अशा घटना घडत आहेत . सध्या खोकला ताप अशा अजारांची साथ आहे त्यामुळे रुग्णाकडुण कप सिरपची मागणी केली जाते मात्र कप सिरपच्या बाटल्या संपल्या आहेत अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.
अॅडमिट असलेल्या रुग्णांची जेवण औषधोपचार सुविधा उपलब्ध असली तरी शौचालयात अपुरे पाणी असल्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रुगाणकडुण तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट घेणे
रुग्णांची हेळसांड थांबवा अन्यथा तिव्र आंदोलन करू..
मोफत औषधोपचार होतील या अपेक्षेने ग्रामीण भागातील भागातील वय वृद्ध नागरिक करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात येत असतात मात्र त्यांची जर अशा पद्धतीने हेळसांड होत असेल तर हि गंभीर बाब असून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दखल न घेतल्यास अंदोलन करू असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक :