छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे चिंभळे येथे श्रमसंस्कार शिबीर
By : Polticalface Team ,11-03-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "युवकांचा ध्यास, ग्राम- शहर विकास" या उपक्रमअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सदर शिबीर गुरुवार दिनांक ०९ ते १५ मार्च या कालावधीमध्ये होत आहे.
सदर शिबिराचा उदघाटन समारंभ दि.०९ मार्च रोजी मा.बाबासाहेब भोस व्हा.चेअरमन (स.म.शि.ना.कारखाना) यांच्या हस्ते पार पडला.त्यांनी अध्यक्षीय उद्धबोधनात शिबीरार्थींना खूप परिश्रम घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.विद्यार्थी समाजपरिवर्तन घडविण्यात मुख्य भूमिका बजावत असून राष्ट्रीय सेवा योजना हे युवकांना दिशा आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करते तसेच "परिश्रम तिथे यश" हा मंत्र विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सूर्यवंशी यांनी केले.त्यांनी प्रास्ताविकपर बोलताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व सांगून नेतृत्व विकासात असणारी भूमीका प्रतिपादित केली.सूत्रसंचालन महीला कार्यक्रम अधिकारी प्रा. कोमल कांबळे यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ. धर्मनाथ काकडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी नागवडे कारखाना संचालक , सावता हिरवे, दत्तात्रय काकडे,प्रशांत दरेकर,सुरेश रसाळ उपस्थित होते.तसेच बापूराव नागवडे(सेक्रेटरी), सौ. छायाताई गायकवाड (सरपंच), वैभव गायकवाड (उपसरपंच) व समस्त चिंभळे ग्रामस्थ उपस्थित होते.
या राष्ट्रीय सेवा योजनेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील १२५ विद्यार्थी स्वयंसेवक आहेत.दुर्गसंवर्धन,वृक्षरोपण,ग्रामस्वच्छता,क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम,व्याख्यानमाला यांच्या आयोजनातून सक्षम युवक घडविला जात आहे.विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे.स्वावलंबन,चारित्र्यवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पध्दतीत घडवून आणणे.या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना आशा शिबीरचे आयोजन करते.
या शिबिरामध्ये प्रा.प्रशांत ढाके,प्रा.संदीप अभंग,प्रा.कोमल कांबळे हे कार्यक्रम अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून प्रा. सागर रोडे सर, प्रा. सखाराम पारखे सर यांचे सहकार्य लाभले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी