हवेली दौंड तालुक्यातील पाटबंधारे कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर

By : Polticalface Team ,11-03-2023

हवेली दौंड तालुक्यातील पाटबंधारे कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड: दौंड ता ११ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील पाटबंधारे कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर आले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांन कडुन व्यक्त केली जात आहे. हवेली तालुका व दौंड तालुक्यातील मौजे यवत पंचक्रोशीतील सर्व शेत जमीनीतील विहिर व बोअरवेल मधील पाणी पाझर थांबला आहे, त्यामुळे शेतीसाठी व नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे मुश्किल झाले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खडक वासला ते इंदापूर उजणी पर्यंत कालव्याच्या माध्यमातून पाणी गळती बंदीस्त करुन, हवेली दौंड तालुक्यातील बागायत शेतजमीनी जिरायत क्षेत्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, पुढील काळात शेतीच्या पाण्या वाचुन जमिनी पडीक पडणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. हवेली दौंड कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरणामुळे शेतकऱ्यांची चिंन्ता वाढली आहे, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शेती पिंकांना पाणी कमी पडू लागले आहे, शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू लागली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गव्हाचे पिक व उत्पादन होणे अतिशय मुश्किल झाले आहे, गव्हाच्या पिकाला शेवटचे पाणी पुरेसे मिळणे आवश्यक आहे, मात्र शेतातील विहिर व बोअरवेल पाण्या वाचुन कोरडे पडले आहेत, त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दौंड तालुक्यातील शेतकरी अडचणीत असल्याचे दिसून येत आहे, या भागातील सर्रास शेतकरी ऊस उत्पादन व गुलछडी व विविध फुल शेतीवर अवलंबून आहे, बारा महिने शेतात राबणारा शेतकरी काही दिवसांपासून शेतीच्या पाण्या वाचुन घरी विश्रांती घेत असल्याचे दिसून येत आहे, पुढी दोन महिने अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत दिसु लागले आहेत. पुर्वी मुळा मुठा कालव्यातील पाणी पाझर होत असल्याने परीसरातील विहीर व बोअरवेल मध्ये पाणी परकुलेशन होत असे मात्र मुळा मुठा कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे, कालव्यातील पाणी इंदापूर उजणी पर्यंत थेट वाहत आहे, सिमेंट काँक्रेट अस्तरीकरणामुळे पाणी गळती बंद झाली, मात्र हवेली व दौंड तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे, पुर्वी मुळा मुठा कालव्यातील गळतीमुळे ओढे नाले विहिर बोअरवेल मध्ये गरजेनुसार पाणी साठा उपलब्ध होत असे मात्र कालव्याच्या आतील भागात सिमेंट काँक्रिटीकरण झाल्या पासुन कालव्यातील पाणी प्रकुलेशन बंद झाले, त्यामुळे पुढील काळात हवेली तालुका व दौंड तालुक्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध होणे मुश्किल झाले आहे. आज पर्यंत या भागातील शेतकरी जुना कॅनेलच्या भरवशावर कमी पाण्यांची पिके घेऊन शेतीवर आपली उपजीविका करत आहेत, अशा वेळी पुण्यातील दुशीत पाणी शेतीसाठी महत्वाचे ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी