करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना आमदार डॉ. वजाहत मिर्झा विधान परिषद सदस्य यांच्याकडून ग्रंथ भेट !

By : Polticalface Team ,12-03-2023

करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना आमदार डॉ. वजाहत मिर्झा विधान परिषद सदस्य यांच्याकडून ग्रंथ भेट ! करमाळा प्रतिनिधी : विधान परिषद सदस्य स्थानिक विकास निधी सन 2022- 23 अंतर्गत मा.आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या आमदार फंडातून करमाळा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील एकूण 34 सार्वजनिक शासनमान्य ग्रंथालयांना प्रत्येकी 90 हजार रुपये किमतीची एकूण 231 पुस्तके ग्रंथालयास भेट स्वरूपात देण्यात आली. आमदार वजाहत मिर्झा यांचे वाचन चळवळीतील योगदान व त्याना वाचनाची असलेली आवड यावरून त्यांनी करमाळा तालुक्यातील शासनमान्य वाचनालयांना ग्रंथ भेट देऊन विद्यार्थी व वाचकांची वाचनाची भूक भागवलेले आहे यामध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षा पुस्तके, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने ,आत्मचरित्र,कृषी विषयक, इत्यादी प्रकारची पुस्तके असून ती सर्व पुस्तके निवडक स्वरूपात आहेत सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय रावजी पवार यांच्या अथक प्रयत्नातून गेले तीन वर्ष सातत्याने करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना विविध आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात येत आहेत, *आदरणीय मिर्झा साहेब यांच्या विकास निधीतून सलग दोन वर्ष करमाळा तालुक्याला हा निधी* अध्यक्ष विजयराव पवार यांच्या माध्यमातून मिळालेला आहे, काल झालेल्या छोट्या खाणी कार्यक्रमात ज्ञानेश्वर वाचन मंदिर करमाळा येथे या ग्रंथांचे वाटप ग्रंथालयाचे जेष्ठ पदाधिकारी काटोळे आबा, मोरे अण्णा व ग्रंथालय संघाचे संचालक प्रमोद बेरे यांच्या उपस्थितीत व शिवसृष्टी प्रकाशनचे प्रमोद पवार, मगर यांच्या हस्ते हे ग्रंथ भेट वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन भास्कर पवार यांनी प्रास्ताविक गणेश पवार महाराज तर आभार शहाजी सरडे सर यांनी मांडले या कार्यक्रम प्रसंगी करंजे, वीट, बोरगाव, पोमलवाडी, भालेवाडी, केम, रावगाव, निंभोरे,फिरे,सरपंच, पांडे ,सांगवी, आळजापूर, ढेकळवाडी, शेलगाव, पांगरे, घोटी, झरे, जातेगाव, कात्रज, वडशिवणे, उंदरगाव, अंजनगाव,केम,सातोली, पोपळज, करमाळा, कोर्टी, अर्जुन नगर ,पांडे आदि वाचनालयातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार वजाहत मिर्झा, व ग्रथालय संघाचे अध्यक्ष विजयराव पवार याचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.