हिवरे कोळगाव निमगाव गावांना वगळून जाणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता ! नागरींकाकडून नाराजीचा सुर आमदारांनी लक्ष घालण्याची युवासेनेची मागणी

By : Polticalface Team ,12-03-2023

हिवरे कोळगाव निमगाव गावांना वगळून जाणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता ! नागरींकाकडून नाराजीचा सुर 
आमदारांनी  लक्ष घालण्याची युवासेनेची मागणी करमाळा. प्रतिनिधी पुर्वभागातील फिसरे हिसरे,हिवरे कोळगाव निमगाव या रस्त्याच्या दुरुस्थी साठी नुकताच ८ कोटी ८६ लाख रू निधी मंजूर झाला असल्याचे वृत प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करुण आमदार संजयमामा शिंदे व प्राशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत होते मात्र हिवरे,कोळगाव निमगाव या गांवाना वगळून एक ही वाडी वस्ती, शाळा, मंदीर नसलेल्या मार्गावरून हा रस्ता थेट गौंडरेला जोडला जाणार असल्याचे समजल्याने हिवरे कोळगाव निमगाव या तीन गावातील नागरिकांकडून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पुर्वभागातील फिसरे ते गौंडरे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे. फिसरे ,हिसरे हिवरे कोळगाव निमगाव ते गौंडरे हा संपूर्ण रस्ता मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन पुर्ण करावा अशी अनेक दिवसांची या गावातील नागरींकाची मागणी होती.

या अगोदर निमगाव पासुन गौंडरे पर्यंतचे दोन तिन किलोमीटर रस्त्याचे प्राधान मंत्री ग्राम सडक योजनेतुन काम पुर्ण होत आहे. व काल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन फिसरे हिसरे हिवरे कोळगाव निमगाव या रस्त्यासठी ८ कोटी ८६ लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर झाल्याने वरील गावांचा राज्य क्रमांक ६८ या मुख्य रस्त्यास जोडणारा प्रवास सुखकर होण्याचे वृत्त व मंजुरीचे परिपत्रक आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले होते. मात्र या निधीतुन हिसरे पासुन पुढे हिवरे ,कोळगाव निमगाव या गावांचा रस्ता न होता हिसरे मधून थेट गौंडरे ला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने हिवरे ,कोळगाव निमगाव या भागातील नागरिकांकडून तिव्र नाराजी चा सुर उमटत आहे.

हिवरे ,निमगाव ,कोळगाव या रस्त्यावरुनच परिवहन विभागाची बस धावत असते या तीन गावांची मिळुन दहा ते बारा हजार लोकसंख्या असून शेकडो विद्यार्थी गौंडरे,हिसरे,व करमाळा येथे शिक्षणासाठी ये जा करत असतात. त्याच बरोबर संपुर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिवरे येथील श्री नागनाथ देवस्थान अनेक भाविक येत असतात मात्र असे असताना मुख्यमंत्री सडक योजनेतुन आलेला निधी या रस्त्यावर खर्च न होता ज्या जिथे एकही लोकवस्ती नाही,मंदीर नाही शाळा नाही गाव नाही अशा रस्त्यावर हा निधी खर्च कशासाठी? व कोणाच्या सोयीसाठी केला जात आहे? असा संतप्त सवाल हिवरे ,कोळगाव निमगाव या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

आमदार संजय मामा शिंदे यांनी लक्ष घालावे- पत्रकार व युवासेना तालुकाप्रमुख या नात्यांने मि स्वतः देखील या मागणीसाठी वारंवार अंदोलनं करून फिसरे पासुन गौंडरे पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यासाठी प्रधान मंत्री किवा मुख्यमंत्री सडक योजनेतुन निधी उपलब्ध करून हा रस्ता डांबरीकरण करावा अशी सातत्यपूर्ण मागणी करत होतो .निधी मंजूर झाल्याचे समजल्यानंतर आनंद झाला मात्र तीन गावांना वगळून हिसरे मधून हा रस्ता थेट गौंडरे ला जाणार असल्याचे समजले त्यामुळे तीन गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा कोणताच फायदा होणार नसल्याने आमदार संजयमामा शिंदे यांना संपर्क साधून हा रस्ता मुख्य रहदारीच्या मार्गावरूनच करावा अशी विनंती केली आहे. लवकरच पुर्वभागातील युवकांचे शिष्टमंडळ घेऊन आमदार संजयमामा शिंदे भेटून निवेदन देणार आहोत.
शंभूराजे शाहुराव फरतडे
युवासेना तालुकाप्रमुख (ठाकरे गट)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी