अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल, पवार कुटुंबावरील नाव न घेता केली जहरी टीका

By : Polticalface Team ,12-03-2023

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल, पवार कुटुंबावरील नाव न घेता केली जहरी टीका करमाळा प्रतिनिधी माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे सांगत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे कारभार करून महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याला महाराष्ट्रातील जनता बांधील नाही तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसामान्यात सहभागी व्हावे लागते अशी टीका सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

करमाळा येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल व आदिनाथच्या संचालिका रश्मीताई बागल यांनी केले यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकासाचा रथ जोरात दवडू लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडातील हक्काचे पाणी स्वतःच्या जिल्ह्यासाठी पळवले विशेषता सोलापूर नगर जिल्ह्याचे पाणी पळवले तर आपली जनता त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचत होती मात्र आता जनता हुशार झाली असून आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेतकरी जागृत झाला आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश बलवान होत असून देशातील शेतकऱ्यांसाठी जवळपास वीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध केला आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा शेतकरी सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याला शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जास्तीत जास्त मदत करू बोलताना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की जातेगाव ते टेंभुर्णी हा रखडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी कडून हा प्रश्न मार्गी लावावा शिवाय करमाळा शहरातील 384 गेली 40 वर्षापासून रहिवास असलेल्या नागरिकांचा मालमत्ता कार्ड उघडून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या अनेक आठवणी सांगितल्या

यावेळी बोलताना रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने बागल कुटुंबीय व मोहिते पाटील कुटुंबात मतभेद झाले होते पण मनभेद झाले नव्हते आदिनाथ चा निवडणुकीनंतर सर्व निवडणुका एकत्रित लढवायची ठरली होती पण ती वेळ गेली मात्र आता इथून पुढे कशा निवडणुका लढवायच्या आहे हे लवकरच ठरवू असे सांगत नारायण पाटील व बागल गट यांची युती करण्यासाठी मोहिते पाटील पुढाकार घेणार असे स्पष्टपणे संकेत दिले

यावेळी बोलताना दिग्विजय बागल यांनी स्वर्गीय दिगंबर बागल यांची अकाली निधन झाल्यानंतर राजकारणात आम्ही पोरके झाले असून आता इथून पुढे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील व रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आमचे पालकत्व घ्यावे अशी जाहीर व्यासपीठावर हात जोडून विनंती केली. या विनंतीला उपस्थित बागल समर्थकांनी टाळ्याच्या कडक करून करून साथ दिली

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाषणाने बागल गटाचे चैतन्य आले असून व्यासपीठावरील मान्यवरांनी आगामी राजकारणात बागल कुटुंबाला साथ देण्याची ग्वाही दिल्यामुळे गटाचे नेते रश्मी बागल कोलते यांच्या चेहऱ्यावर हसू फुलून आत्मविश्वास वाढल्याचे त्यांच्या हालचाली येऊन दिसत होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.