सहा महिने उलटून गेले तरी नुकसान भरपाई नाही; शेतकरी प्रतीक्षेत,,,,,, नुकसान भरपाई देण्याची प्रहार जनशक्ती संघटनेची मागणी

By : Polticalface Team ,12-03-2023

सहा महिने उलटून गेले तरी नुकसान भरपाई नाही; शेतकरी प्रतीक्षेत,,,,,, नुकसान भरपाई देण्याची प्रहार जनशक्ती संघटनेची मागणी
करमाळा प्रतिनिधी परतीच्या अवकाळी पावसाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. 6 महिन्यांपूर्वी पंचनामे देखील झाले, मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहे. दिवाळी पूर्वी परतीचा पाऊस झाला होता. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने तालुका स्तरावर दिले होते. पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई जमा झाली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा दिवाळी तोंडावर आली होती. त्यावेळी दिवाळी गोड करू असे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र पंचनामे होऊन 6 महिने उलटली तरी अद्याप रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नाही. कांदा, ज्वारी, बाजरी, मका तसेच इतर फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोडून पडण्याची वेळ आली आहे. नुकसान भरपाई मिळाल्यावर एक आधार मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र प्रतीक्षा करूनही भरपाई मिळत नाही. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले होते. झटपट झालेल्या पंचनाम्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा होती. नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता संघटना देखील रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी बळीराजा करत आहे.
सहा महिन्यांपूर्वी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी शासकीय अधिकारी करून गेले होते. तात्काळ मदत मिळेल असे शासन स्तरावरून सांगितले जात होते. मात्र ६ महिने होऊन देखील शासनाने नुकसान भरपाई खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट आलं आहे. शासनाने गांभीर्य ओळखून नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी. - विपुल गोरे (शेतकरी)


सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधीची तरतूद देखील केली आहे. मात्र निधी मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुढील ७ दिवसात जर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. - संदीप तळेकर (तालुकाप्रमुख प्रहार जनशक्ती संघटना)


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष