करमाळा येथील भूमि अभिलेख कार्यालयातील अंदाधुंदी व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी आपल्या कुटुंबासहित तहसील कार्यालयासमोर करणार आत्मदहन

By : Polticalface Team ,12-03-2023

करमाळा येथील भूमि अभिलेख कार्यालयातील अंदाधुंदी व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी  आपल्या कुटुंबासहित तहसील कार्यालयासमोर करणार आत्मदहन करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील साडे येथील शेतकरी विकास बापू खराडे हे करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अंदाधुंदी व भोंगळ कारभाराविरोधात वैतागले असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे त्यांनी आपली जीवन यात्रा कुटुंबासहित तहसील कार्यालय समोर आत्मदहन करून संपविणार असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे सोलापूर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे याची सर्वस्वी जबाबदारी करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे

श्री खराडे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मी साडे येथील रहिवासी असून मी माझे शेतीत वस्तीवर माझे कुटुंबासह राहत आहे गट नंबर 100 मध्ये माझे सह भाऊ व इतर भावकी यांचे क्षेत्र आहे सदर गटाची मोजणी 20/ 12/ 2018 व 10 /12 /2022 रोजी श्री मिश्किल व श्री एस एफ चौरे यांनी करून वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत तसेच माझे शेजारील गट नंबर 102 ची 5/07/ 2021 रोजी मोजणी होऊन श्री घुगे व व्ही व्ही मोठे यांनी करून वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत गट व क्षेत्र एकच असून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी मोजणी करून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत यामध्ये नक्कीच काहीतरी काळेबेरे असू शकते मोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला कधीच विश्वासात घेतले नाही आम्हाला नीट बोलले सुद्धा नाहीत या प्रकाराने मला व माझे कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे असे निवेदनात श्री खराडे यांनी म्हटले आहे तरी मौजे साडे तालुका करमाळा येथील गट नंबर 100 व गट नंबर 102 ची चुकीची मोजणी करणाऱ्या संबंधित भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्याची खातेनिहाय चौकशी करावी तसेच या प्रकरणाची त्वरित चौकशी न झाल्यास मी माझ्या कुटुंबासहित येत्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे श्री खराडे यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे

निवेदनाच्या प्रती श्री खराडे यांनी अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडवणीस, माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, सोलापूर उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी, तहसीलदार करमाळा, उपअधीक्षक भूमी अभिलेख करमाळा यांना पाठवल्या आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी