छत्रपती महाविद्यालयाच्या चिंभळे येथील श्रमसंस्कार शिबिरात आनंदी जीवनाचा मूलमंत्र कार्यक्रम.
By : Polticalface Team ,13-03-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने चिंभळे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अष्टपैलू व्याख्याते प्रा. शंकर गवते यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांचे "आनंद घ्यावा जीवनाचा" या विषयावर व्याख्यान झाले. व्यक्तिमत्व विकास, तरुणांची जीवनशैली आणि जीवन जगण्याची कला यावर जनजागृती करण्यात आली.
तरुणांच्या समोरील समस्या, हसत खेळत जगून संकटांवर मात करण्याची गुरुकिल्ली देत उपस्थितांच्या मनावरील ताण दूर केला व त्यानंतर विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना विनोदी वातावरण निर्मिती करून विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व विकास कसा साधावा यावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थ व शिबिरार्थी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमासाठी नागवडे कारखाना आणि छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेन्द्र दादा नागवडे हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी आपल्या भाषणात सामाजिक विकास होण्यासाठी युवकांची भुमिका खूप महत्त्वाची असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते समाजपरिवर्तन करु शकतात असे नमूद केले. प्रमुख पाहुणे संचालक मा. श्री. सुभाष काका शिंदे व मा. विठ्ठलराव जंगले उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सहभागाने सर्व कार्यक्रम राबवण्यात येत असून सूत्रसंचालन, आभार, पाहुण्यांचा परिचय व सत्कार इत्यादी कामांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यांना विविध कामांच्या नियोजनाचा अनुभव भेटतो आणि व्यक्तिमत्त्व विकासात भर पडते.
सदर कार्यक्रमावेळी शिबिरातील कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत ढाके, त्यांचे सहकारी डॉ. संदिप अभंग, प्रा कोमल कांबळे,प्रा. सागर रोडे, प्रा. सखाराम पारखे, प्रा. ज्योती गुंजाळ, प्रा. गिरमे मॅडम, श्री.लक्ष्मण मोरे, श्री. सतिश कापरे यांच्या सहभागातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
यावेळी ग्रामस्थांमधून मा. रमेश गायकवाड, मा. वैभव गायकवाड, मा. संजय सावंत, मा. किरण गायकवाड, मा.काटे साहेब, मा. संभाजी गायकवाड, मा.बाळासाहेब सावंत, मा.चंद्रकांत गायकवाड, मा. विठ्ठल गायकवाड, मा. राजेन्द्र गायकवाड, मा. तात्यासाहेब गायकवाड, मा. दीपक गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी