श्रीगोंद्यात राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या संपाला 100% प्रतिसाद तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निषेध सभा

By : Polticalface Team ,14-03-2023

श्रीगोंद्यात राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या  संपाला 100% प्रतिसाद
तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निषेध सभा   
लिंपणगाव (प्रतिनिधी )-- राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समितीने पुकारलेला 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपाला श्रीगोंदा तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुका राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समिती आदींनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाविरुद्ध घोषणा देऊन आपला सर्वच विविध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. यावेळी जवळपास 500 कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंगळवारी 14 मार्च रोजी समन्वय समितीचे पदाधिकारी राजेंद्र खेडकर, जे एस सदाफुले, एस बी घोडेकर, एस एस भोर, दिलीप काटे, हनुमंत रायकर, आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, सर्वांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरा, विशेष आरोग्य विभागातील विनाअठ अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्या, निवृत्तीचे वय 60 करा,आगाऊ वेतन वाढीचे धोरण लागू करा, गट ड चि पदे विपगत करू नका, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करा, खाजगीकरण व कंत्राटीकरणास विरोध या प्रमुख व इतर मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर जिल्हा परिषद पालिका कर्मचाऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, समन्रवय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकार प्रमुखांची म्हणजेच मुख्यमंत्री यांची भेट घडावी व या उच्च पातळीवर निर्णय चर्चा व्हावी, यासाठी लेखी व मौखिकरित्या अनेक प्रयत्न झाले. राज्याचे मुख्य सचिव यांनी ठरवलेली चर्चासत्रे विविध कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलली गेली अद्याप सदर चर्चासत्रे संपन्न होऊ शकलेली नाहीत, असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध सभेत मनोगत व्यक्त केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डॉ योगिता ढोले यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ढोले म्हणाल्या की आपल्या समन्वय समितीच्या मागण्या रास्ता असून आपण दिलेले निवेदन शासनापर्यंत कळवू असे ढोले यांनी यावेळी संपकऱ्यांना सांगितले. याप्रसंगी अनेक अधिकारी कर्मचारी यांनी शासन कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसापासून च्या मागण्यांकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करते याकडे लक्ष वेधले प्रामुख्याने राजेंद्र कळसकर, सुनील भोर, संतोष टकले, एस बी खताळ, एम एस लगड, सागर कुलथे, हनुमंत रायकर टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, उपाध्यक्ष एन टी शेलार, शुभांगी शेळके, दिलीप तुपे, प्रशांत खामकर, बबन गाडेकर, राम जाधव, सुपेकर तलाठी, बापूसाहेब गायकवाड, राजेंद्र खेडकर, किशोर जामदार, आरोग्य विभागाच्या कांता जाधव आदींसह ,अन्य कर्मचाऱ्यांनी शासन निर्णया विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. संपाचा पहिला दिवस असल्याने शासनाच्या सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती समन्वय समितीचा पुढील आदेश येईपर्यंत बुधवारी 15 मार्च पासून दहा ते बारा वाजेपर्यंत सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी समन्वय समितीचे पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्रित येऊन जोपर्यंत शासनाला प्रमुख मागणी सर्वांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करत नाही व इतर प्रमुख मागण्या शासन मान्य करत नाही, तोपर्यंत निषेध सभा घेणार आहेत असे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीने यावेळी जाहीर केले. पेन्शनर संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान 14 मार्चपासून सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे शाळा महाविद्यालय सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय कर्मचारी संपावर गेल्याने ओस पडली होती अनेकांची शासकीय कामे देखील खोळंबली गेली आहे. शासनाने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करावेत, विद्यार्थी- पालक सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. सूत्रसंचालन दिलीप काटे यांनी केले. आभार जे एस सदाफुले यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष