श्रीगोंदा तालुक्या मध्ये सशस्त्र दरोडा एक जण जागीच ठार, सुमारे ५०हजारांचा मुद्देमाल लंपास

By : Polticalface Team ,15-03-2023

श्रीगोंदा तालुक्या मध्ये सशस्त्र दरोडा एक जण जागीच ठार, सुमारे ५०हजारांचा मुद्देमाल लंपास
श्रीगोंदा दि.१४ प्रतिनिधी-: श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याअंतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्ती वरील कल्याण मच्छिंद्र गायकवाड(वय 42) यांच्या घरी दि. 13 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यामध्ये सुमारे पाच हजार रुपये रोख रकमेसह एक तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला.तर अज्ञात दरोडेखोरांकडून कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांना टणक हत्याराने डोक्यात झालेल्या जबर मारहाणीत यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 13 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याअंतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्ती येथे कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास ५ ते ६ दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये त्यांनी कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या पत्नीच्या गळ्यातील व मुलीच्या कानातील सोन्याचा ऐवज दमदाटी व मारहाण करून हिसकवला तर घरातील रोख रक्कम ५ हजार रुपये घेतले.यामध्ये कल्याण गायकवाड यांनी दरोडेखोर यांना प्रतिकार केला असता त्यांनी त्यांच्यावर प्रती हल्ला करत त्यांना टणक हत्याराने जबर मारहाण केली.यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. याबाबत ची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला.तद्नंतर पंचनामा केला व मयत कल्याण गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. चौकट:- बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर अरणगाव येथील नागरिकांनी जो पर्यंत या खुनाच्या गुन्ह्यातील दरोड्याचा तपास लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत अरणगाव येथील ग्रामस्थ व परिसरातील नागरीकानी घेतल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे त्यातच बेलवंडी पोलीस स्टेशनला एकाच महिन्यात तीन पोलीस निरीक्षक आल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे मनोबल वाढले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी