शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी धडकला मोर्चा,
सर्व शिक्षक संघटना संपात एकवटल्या,
हजारोंच्या संख्येने शिक्षक बांधव व महिला शिक्षिकांचा सहभाग
By : Polticalface Team ,15-03-2023
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि.14 मार्च) धडक मोर्चा काढण्यात आला. सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांनी एकजुटीन या मोर्चात सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षक बांधव व महिला शिक्षिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, शिक्षक भारतीचे आप्पासाहेब जगताप, बाबासाहेब बोडखे, प्राथमिकचे शिक्षक संघटनेचे बापूसाहेब तांबे, संजय कळमकर, वैभव सांगळे, शेखर उंडे, अन्सार शेख, महेश पाडेकर, सखाराम गारुडकर, शरद दळवी, अमोद नलगे, भिमाशंकर तोरमल, भानुदास दळवी, राजू पवार, रविंद्र गावडे, रुपाली कुरुमकर यांनी केले.
शहरातील गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयाच्या मैदानात शहरासह जिल्ह्यातील शिक्षक एकत्र आले होते. गुलमोहर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिक्षकांनी शिस्तबध्द पध्दतीने मोर्चाचे नियोजन केले होते. महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आंदोलक शिक्षकांनी डोक्यावर जुनी पेन्शनच्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. आंदोलकांनी जुनी पेन्शन व शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडलेल्या या मोर्चाचे समन्वय समितीच्या आंदोलनात समावेश झाला. मोठ्या संख्येने जमलेल्या शिक्षक आंदोलकांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता देखील काही काळ बंद होता. यावेळी शिक्षक व सरकारी कर्मचारींच्या जुनी पेन्शनच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. तर प्रमुख पदाधिकार्यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शनची मागणी करुन, शासनाच्या शैक्षणिक व कर्मचारी धोरणावर तीव्र शब्दात टिका केली.
जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. काम बंद ठेऊन शिक्षक या संपात उतरले असून, सर्व शिक्षक संघटना जुन्या पेन्शनसाठी एकवटल्या आहेत.या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन, आदर्श बहुजन शिक्षक संघ (इब्टा), महाराष्ट्र राज्य ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, एकल शिक्षक मंच या सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
-------------------
संपाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत शाळा बंद, तर दहावी व बारावी बोर्डाची परीक्षेला सहकार्य करण्याचा निर्णय
अहमदनगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा मुख्याध्यापक शिक्षकेतर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मोर्चाच्या समारोपनंतर झालेल्या बैठकीत संपाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला संबंधित पर्यवेक्षक, केंद्रसंचालक आदींनी उपस्थित राहून काळ्याफिती लावून परीक्षेचे कामकाज करावे, मस्टरवर स्वाक्षरी करू नये, इतर वर्गाना सुट्टी द्यावी व समन्वय समितीच्या सदस्यांनी तालुका स्तरावर संघटनेच्या कार्यालयात जिल्हास्तरावर माध्यमिक सोसायटीत सकाळी 11:00 ते 2:00 या वेळेत उपस्थित रहावे, मुख्याध्यापकांनी दहावी व बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळास्तरावर ताब्यात घ्यावे, मात्र पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा, शिक्षकांनी बोर्डाचे पेपर तपासणीसाठी ताब्यात घेऊ नयेत, हे निर्णय करण्यात आले आहेत. तर शाळेने कोणताही निर्णय परस्पर घेऊ नये, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष