श्रीगोंद्यात दुसऱ्या दिवशीही राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संपाचा एल्गार
सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प
By : Polticalface Team ,15-03-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- राज्य सरकारी- निम सरकारी शिक्षक कर्मचारी आदींच्या समन्वय समितीने पुकारलेला 14 मार्चपासूनचा राज्यव्यापी संप अधिक तीव्र होत चाललेला असून, श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय संपामुळे ठप्प झाल्याचे दिसून आले. या समन्वय समितीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी देखील जवळपास 600 कर्मचाऱ्यांनी श्रीगोंदा तहसील प्रांगणामध्ये उपस्थित राहून प्रमुख मागणी" एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देत तहसील कार्यालय दणाणून सोडले. याप्रसंगी समन्वय समितीचे घटक हरिश्चंद्र नलगे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या विरुद्ध कडाडून भाषणे केली. याप्रसंगी काही महिलांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे यावेळी म्हणाले की ,राज्य सरकार संप तोडण्यासाठी इंग्रज नीतीचा प्रयोग अवलंबित आहे. परंतु कोणत्याही कारवाईला कर्मचाऱ्यांनी घाबरू नये, एका प्राथमिकच्या शिक्षक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन कोणतेही ठोस आश्वासन न घेता संपातून माघार घेतली, ही दुर्दैवी बाब आहे त्याचा निषेध करतो हा लढा अखंडपणे लढण्यासाठी आम्ही सर्व प्राथमिक शिक्षक संपात सामील असून, जोपर्यंत शासन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत हा तीव्र लढा समन्वय समिती बरोबर ठाम राहणार असल्याचे श्री मोटे यांनी सांगितले.
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव रमजान हवलदार यावेळी म्हणाले की, जुन्या पेन्शन साठी संपूर्ण राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचरी आक्रमक असून, सरकार मात्र कर्मचाऱ्यांचे हक्कावर गदा आणत आहे. संप काळात आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून दहावी व बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार न टाकता काळ्याफिती लावून परीक्षेचे कामकाज करत आहोत. परंतु राज्यकर्ते मात्र फोडा व झोडा या नीतीच अवलंब करत आहे. असे सांगून हवालदार पुढे म्हणाले की, अनेक शासकीय विभागात अनेक वर्षापासून नोकर भरती नाही, त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. पूर्वी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे म्हणून तीव्र आंदोलन केले त्यानंतर शासनाला जाग आली आणि आज संपूर्ण राज्यात शिक्षक कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकजूट कायम ठेवावी यश निश्चित मिळणार असल्याचे सांगितले.
ग्रामसेवक संघटनेचे राज्य सचिव अनिल जगताप यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, सरकार संपूर्ण सरकारी यंत्रणा संपुष्ट करायची मानसिकतेत असून तशी भूमिका राज्यकर्त्यांची दिसून येते. लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार असतो. सर्वांना वेतन व पेन्शन मिळणे हा देखील हक्क आहे. सर्वांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळाली पाहिजे. हा देखील घटनेने दिलेले अधिकार असून, आमचा तो हक्क आहे त्यामुळे शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन दिलीच पाहिजे असे जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देविदास खेडकर, संदीप खाडे, नवनाथ गोरे, कैलास ठाणगे, आरोग्य विभागाच्या मंगल शेळके, जयराम धांडे, दीपक खेंडके, उत्तरेश्वर मोहोळकर, श्री गदादे, डॉ टकले आदींनी शासन निर्णयाच्या विरोधात कडाडून भाषणे केली.
यावेळी देवराम दरेकर, राम जंजिरे, भाऊसाहेब वाघ, भीमराव आनंदकर ,बाजीराव कोरडे, सचिन झगडे, रामदास ठाकर, संभाजी इथापे, ज्ञानदेव धायगुडे, जे एस सदाफुले आदिसह राज्य सरकारी निमसरकारी समन्वय समितीचे व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद गावडे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.