छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तर्फे डॉ.निलेश खेडकर यांचा धर्मवीर गडावर विशेष सन्मान देऊन गौरव
By : Polticalface Team ,15-03-2023
श्रीगोंदा :
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मुर्तीदिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले_धर्मवीरगड पेडगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे दिनांक ११ मार्च २०२३ रोजी बलिदान स्फुर्तीदिनाचे आयोजन करण्यात आले होते....
या कार्यक्रमात स्वच्छता मोहीम, दांडपट्टा मर्दानी खेळ, नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने झाली, तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले,डॉ. निलेश खेडकर यांनी आतापर्यंत केलेल्या गडकोट संवर्धन,वृक्षारोपण, गडावरील पुरातन वास्तू जतन,गड जगाच्या नकाशावर येण्यासाठी तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी साहेब यांच्याकडे केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्या मुळे भूमिआभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून त्याची रीतसर मोजणी करून शासन दरबारीं नोंद लावायचे काम केले तसेच गड विकासासाठी शासकीय अधिकारी वर्गाला वेळोवेळी पाठपुरावा केला,लवकरच गडावर दिवाबत्तीची सोय उपलब्ध करून गड प्रकाशमय करण्याचे काम देखील आपणा सर्वांच्या सहकार्याने व मदतीने पूर्ण होणार आहे तसेच ईतर सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्राचे लाडके आमदार शहाजी बापू पाटील,परीक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभाताई पाचपुते व डॉ. प्रणोतीताई जगताप, समिती अध्यक्ष शंकर आप्पा जाधव यांच्या हस्ते डॉ.निलेश खेडकर यांना शिवकार्य विशेष सन्मान देऊन सन्मानीत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या,आपण कार्य करत असलेल्या ठिकाणी मायभूमीत, कर्मभूमीत मिळालेला सन्मान हा ईतर पुरस्कारापेक्षा खूप मोठा असतो,या पुरस्कारामुळे नवी उमेद व ऊर्जा प्राप्त झाली आहे,भविष्यातील माझ्या नव्या संकल्पनांना प्रोत्साहन मिळाले आहे, या ऊर्जेवर पुढील काळात मला अधिक चांगले आणि आदर्शवत काम उभे करण्यास मदत होणार आहे,सामाजिक जाणीव ठेवून, काम करणारा एक शिवबाचा मावळा म्हणून झालेल्या या गौरवाने माझी जबाबदारी वाढली आहे,पुढील वाटचालीला समितीच्या च्या माध्यमातून यशाचे वलय लाभले आहे,त्यामुळे मला खूप आनंद झाला असून, हा आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात पेरण्याचे काम यापुढेही माझ्याकडून होईल,हा सन्मान मी माझ्या सोबत नेहमी उभ्या असणाऱ्या माझ्या सर्व सहकारी मित्र,मैत्रीणींना,घरातील लहान-थोरांना, गडावरील गडपालांना, कर्मचाऱ्यांना व हितचिंतकांना गडावर कार्यरत असणाऱ्या सर्व संस्था,संघटनांना समर्पित करतो कारण त्यांच्या शिवाय हे शिवधनुष्य पेलण्याची ताकत मला मिळालीच नसती .....
याप्रसंगी मान्यवर साजन पाचपुते,वैभवदादा पाचपुते, SJ LIVE दुबईचे सागर जाधव, सुवर्णाताई पाचपुते, हरिदासआबा शिर्के, प्रवीणभैया शेलार,भारतीताई इंगवले, रविभाऊ शिरसाठ,आकाश शिंदे,प्रविण झांबरे,सुनिल खेडकर,भगवान कणसे,गणेश झिटे,बाळासाहेब नवले,नितीन घोडकेसर,इरफान पिरजादे,अशोक गोधडे,जालिंदर खेडकर, सुनिल कदम, विशाल खेडकर, शेखर खेडकर,पुरातत्व विभागाचे मच्छिन्द्र पंडित,भाऊ घोडके,नंदू क्षीरसागर,ग्रामस्थ आदींसह शिवशंभूभक्त उपस्थित होते....
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.