यवत येथील गुंजन सिनेमा थेटर मध्ये रौदळ मराठी चित्रपट अभिनेता भाऊसाहेब शिंदे व अभिनेत्री स्नेहा सोनवणे यांचा सत्कार

By : Polticalface Team ,16-03-2023

यवत येथील गुंजन सिनेमा थेटर मध्ये रौदळ मराठी चित्रपट अभिनेता भाऊसाहेब शिंदे व अभिनेत्री स्नेहा सोनवणे यांचा सत्कार दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १५ मार्च २०२३ रोजी दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे असलेल्या गुंजन सिनेमा थेटर मध्ये मराठी चित्रपट अभिनेता भाऊसाहेब शिंदे व अभिनेत्री स्नेहा सोनवणे यांनी दि १५ मार्च रोजी भेट दिली, या वेळी यवत येथील गुंजन टॉकीजचे मालक संतोष खराडे यांचे वडील तात्याबा खराडे व यवत पोलीस स्टेशनचे एपीआय पोलीस निरीक्षक माधुरी तावरे मॅडम यांच्या हस्ते अभिनेता भाऊसाहेब शिंदे व अभिनेत्री स्नेहा सोनवणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक रविंद्र लोखंडे युवा कार्यकर्ते सुरज चोरगे, यांनी मनोगत व्यक्त केले. रौदळ हा सिनेमा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी बनवला आहे महाराष्ट्रातील ऊस बागायत दारांच्या अडचणी सिनेमाच्या रूपातून दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यासाठी सिनेमा बनवला आहे तो सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, तुम्ही सिनेमा पाहिल्या नंतर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, हा सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचला तरच सिनेमा बनवल्याचे चिज होईल अशी प्रतिक्रिया (रौदळ) मराठी चित्रपटातील अभिनेता भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केली. रौदळ ही एक शेतकऱ्यांच्या कष्टाची व जिद्दीची गोष्ट आहे, हा सिनेमा सगळ्यांनी बघा व इतर शेतकऱ्यांना सांगा अशी प्रतिक्रिया अभिनेत्री स्नेहा सोनवणे यांनी व्यक्त केली.

यवत पंचक्रोशीतील युवा तरुणांनी गुंजन टॉकीज येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती, गेली दोन महिन्या पासून रौंदळ सिनेमा सुरु आहे, त्या मधील प्रमुख भुमिकेत असणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे हे शेतकऱ्याच्या भूमिकेत असुन, कारखानदार वजन काट्यात शेतकऱ्यांच्या उसाची होणारी चोरी उघडकीस आणून पोल खोल केली असल्याचे शेतकरी प्रेषकांच्या निदर्शनास आणून दिली आहे, यामध्ये सर्व सामान्य व बागायतदार शेतकरी कसा अडचणी सापडला जातो याचा अभिनय रौंदळ सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करुन महत्त्वाची भुमिका बजावली आहे, त्यामुळे हा रौदळ सिनेमा आपल्या ग्रामीण भागातील सिनेमा प्रेक्षकांसाठी शिक्रापूर, यवत, नव्हरा या ठिकाणी हाउसफुल चालला आहे.

अभिनेता भाऊसाहेब शिंदे यांनी या पूर्वी खोडा नंतर बबन आणि आता रौंदळ हा सिनेमा करुन युवा तरुण प्रेषकांमध्ये उत्सुकता व आकर्षित पणा निर्माण केला आहे, शेतकऱ्यांची जीवन गाथा या सिनेमाच्या माध्यमातून समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, बबन सिनेमांमध्ये दूध डेरीच्या माध्यमातून गवळ्यांना उचल देऊन दूध संकलन करण्याची प्रक्रिया दाखवली तसेच सहकार साखर कारखान्याचे चेअरमन व सहकारातील दहशतीच्या जोरावर सर्व सामान्य शेतकऱ्याला अडचणीत आणण्याची राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा परिणाम शेतकरी कसा बळी पडतो हे या रौंदळ सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष