श्रीगोंद्यात तिसऱ्या दिवशी देखील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता मोठ्या संख्येने वाढली, एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देत संपकरी आक्रमक

By : Polticalface Team ,17-03-2023

श्रीगोंद्यात तिसऱ्या दिवशी देखील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता मोठ्या संख्येने वाढली,  एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देत संपकरी आक्रमक लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंद्यात तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 16 मार्च रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप अधिक तीव्र स्वरूपाचा होताना दिसला विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आज संपाचा तिसरा दिवस असल्याने कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन कायम ठेवून जवळपास 700 कर्मचारी या संपामध्ये सक्रिय झाल्याचे दिसले. श्रीगोंद्यात दररोज श्रीगोंदा तालुका राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जोपर्यंत राज्य सरकार जुनी पेन्शन कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू करत नाही. तोपर्यंत हा संपाचा लढा चालू ठेवण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला असल्याचे तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर यांनी श्रीगोंदा येथे संपकरी कर्मचाऱ्यांसोबत बोलताना सांगितले. दरम्यान 16 मार्च रोजी संपाचा तिसरा दिवस असल्याने श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पेन्शनर संघटनेचे एम एस लगड यांच्या अध्यक्षतेखाली ठिय्या आंदोलन करून शासनाला आपल्या मागण्यांची जाणीव व्हावी, यासाठी विविध शासकीय खात्यातील कर्मचाऱ्यांसह पेन्शनर नेत्यांनी मनोगत व्यक्त करून या संपाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरली. यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बन्सी उबाळे यावेळी म्हणाले की, राज्य सरकार सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. यापूर्वी 54 दिवसाचा संप झाला त्याकाळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून राज्य सरकारवर मोठा दबाव आणला. त्याकाळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. काही दिवसांमध्ये दादांचे सरकार गडगडले आणि पुन्हा शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री बनले. पवार साहेबांनी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथम सरकारी कर्मचारी हे कुटुंबाचा घटक समजून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या त्यातून सर्वांना लाभ मिळाला. आता पुन्हा पूर्वीच्या संपाचे दिवस आठवले कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या निर्णयावर ठाम राहावे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन महत्त्वाचे आहे .सर्वांनी या संपाच्या तीव्र लढ्यात सहभागी व्हावे असे सांगितले.

प्राथमिक शिक्षकांचे नेते अविनाश निंभोरे यावेळी बोलताना म्हणाले, सरकारने नोकऱ्या दिल्या हा उपकार नव्हे. आमच्यामध्ये बुद्धी कौशल्य भावी पिढीला उत्तम संस्कार देऊन सरकारच्या योजना तळागाळापर्यंत राबवतो. अंमलबजावणी करतो सरकारी नोकरीत आम्हाला देखील सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय लाभ मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा असते. परंतु सरकार मात्र या आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. राज्याचे उपमुख्यमंत्री दररोज मीडियासमोर आश्वासने देतात आम्ही मागण्या तत्वता मान्य करतो, परंतु त्याची कार्यवाही होत नाही, जुनी पेन्शन हे आम्हाला म्हातारपणाचा आधार आहे. परंतु तो देखील आम्हाला मिळत नाही. आमदार खासदारांना सर्व वेतन भत्ते व सर्व सुविधा तात्काळ मंजूर करून दिल्या जातात. सद्यस्थितीला संपाच्या लढ्याची तीव्रता संपूर्ण राज्यात वाढत चालली असून, महिला कर्मचारी देखील आता या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने तात्काळ जुन्या पेन्शन सह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा निंभोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रा बाळासाहेब बळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्या हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु सरकार मात्र वेळ काढून करतय .आंदोलन, बेमुदत संपाची तीव्रता संपूर्ण राज्यात शंभर टक्के दिसती. संपकेरी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत एक संघ संपामध्ये सक्रिय राहून, न्याय मागण्या मान्य होण्यासाठी सहभागी व्हावे, सरकार नावाची व्यवस्था सतत संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात असून, सरकार मात्र फोडा व झोडा ही नीती वापरत आहे. सरकारला ठिकाणावर आणायचे असेल तर संघटन महत्त्वाचे आहे .असे सांगून बळे पुढे म्हणाले की, कर्मचारी हे शेतकऱ्यांची मुले असल्याने शेतकऱ्यांनाही त्याची पूर्ण जाणीव आहे. संपकरांकडून आंदोलनाची तीव्रता कमी होता कामा नये .शासन संघटनेत फूटपाडून संपाची धार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक संघटनेने सक्रिय राहून समन्वय ठेवावा यश निश्चित मिळणार आहे.

यावेळी राम जंजिरे, महेश शिंदे, पंढरीनाथ सुपेकर ,शरद राऊत, राजेंद्र खेडकर, राम जाधव, पाडळे मॅडम, श्री ढीसले आदींनी शासनाच्या भूमिक वर आपल्या भाषणातून ताशेरे ओढली. * याप्रसंगी प्रांतअधिकारी सुधाकर भोसले यांनी संपकांरी कर्मचाऱ्यांची भेट देत पाठिंबा देऊन कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत सादर करू असे आश्वासन दिले. यावेळी गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांनी पाठिंबा देत आंदोलन स्थळी भेट दिली. .

या आंदोलनात राजेंद्र खेडकर, बाळासाहेब जठार, वसंत दरेकर, रमजान हवालदार, उद्धव गायकवाड ,सचिन झगडे, बापूराव भिसे, केशव मोंढवे, सचिन जामदार, रामदास ठाकर, विजय गावडे ,मधुकर नागवडे, हनुमंत रायकर, राजेंद्र हिरवे ,नारायण झेंडे, रवींद्र भोंडवे पंडित लष्करे आदींसह विविध शासकीय खात्यातील संघटनाचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय रामफळे व शरद गावडे यांनी केले. आभार दिलीपराव काटे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष