जुनी पेंशन साठी क्रांतीची ज्योत पेटवा: प्रा किसन चव्हाण

By : Polticalface Team ,17-03-2023

जुनी पेंशन साठी
क्रांतीची ज्योत पेटवा:  प्रा  किसन चव्हाण      शेवगाव (प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधीनी भारतीय जनतेला *करेंगे या मरेंगे*। असा नारा दिला आणी इंग्रजा विरोधात कन्या कुमारी पासुन कशमीर पर्यंत क्रांतीची ज्योत पेटवली होती त्याच पध्दतीने आज जुनी पेंशन साठी सर्व घटकातील कर्मचार्यांनी एकत्र येवून संघर्ष करणे कर्म प्राप्त ठरले आहे पंजाब, हरियाणा,चंदिगढ येथील शेतकर्यांनी एकत्रित येवून शेतकरी विरोधी कायदा रद्द करायला सरकारला भाग पाडले त्याच पध्दतीने कर्मचार्यांची एकजुट पेंशन मिळू शकते असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चा समोर बोलतांना केले

आज संपाच्या चौथ्या दिवशी शेवगाव शहर व तालुक्यातील शासकीय व निमशासकिय शिक्षक व सर्व कर्मचारी शेवगाव पंचायत समिती पासुन मोठी पायी फेरी काढून *एकच मिशन जुनी पेंशन, पेंशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्यामालकीचे ,कोण म्हणतो देणार नाही,घेतल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक घोषणा देत हजारो कर्मचारी शेवगाव तहसील कार्यालय येथे आले या आंदोलन मध्ये प्रा किसन चव्हाण,मछिंद्र भापकर,कैलास जाधव, राजेन्द्र फरताळे , वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, कॉम्रेड संजय नांगरे, प्रशांत बरबडे,शेख सिकंदर, सुभाष गर्जे, अशोक नवलसर,बाळासाहेब पाचरणे, विलास लवांडे, सचिन पाटील, किशोर पवार, गणेश बोडखे, विठ्ठल खर्चन,शिलाताई अंभग,व ईतर शासकीय व निमशासकिय शिक्षक व कर्मचारी तसेच महिला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रा किसन चव्हाण, मछिंद्र भापकर, शिलाताई अंभग यांची उत्साहवर्धक व मार्गदर्शन पर भाषणे झाली या वेळी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण म्हणाले की कोणत्याही शासकीय व निमशासकिय शिक्षक व कर्मचारी यांनी सत्ताधार्यांच्या धमक्यांना घाबरू नये आपण लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत वेळ प्रसंगी जेल मध्ये ही जाण्याची तयारी ठेवा हे सरकार सर्वांनाच वेठीस धरत आहे घाबरण्याचे काहीही कारण नाही वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत ठाम पणे उभी राहील या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कल्याण मुटकुळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार कैलास जाधव यांनी व्यक्त केले जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे असे आंदोलन करत्यांनी सागींतले उद्या उपोषण, आंदोलनाचा पाचवा दिवस आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी