यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिपट्याचा मृत्यू वन अधिकारी यांच्या हलगर्जी पणाने बिबट्याचा गेला जीव
By : Polticalface Team ,18-03-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौड ता १७ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, भुलेश्वर फाटा नाईकबाग हायवे महामार्गावर अचानक बिबट्या समोर आल्याने अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने धडक दिली असावी असा अंदाज वर्तवला जात असुन सोलापुर बाजुकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना दि १७ मार्च २०२३ रोजी रात्री १० वा. सु घडली
यवत येथील नाईकबाग परीसरात गेली तीन महिन्या पासून बिबट्याचे दर्शन सतत घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी दौंड वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बिबट्या पकडण्याची मागणी केली होती मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले वेळीच या बिबट्याला जेरबंद केले असते तर आज या वन प्राण्याचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
यवत परीसरात लोकवस्ती मधी बिबट्याचा वावर होता मात्र या वन प्राण्याने कोनतेही हिंसक प्रकार केले नाहीत किंवा पाळीव प्राणी शिकार केल्याची घटना घडली नाही, अचानक बिबट्याचा अपघात झाल्याची घटना घडली असल्याची खबर गांवभर पसरली असल्याने खळबळ उडाली आहे, दौंड विभागीय वन अधिकारी यांच्या हलगर्जी पणा मुळे बिबट्याचा नाहक बळी गेला, या ठिकाणी गेली तीन महिन्या पासुन बिबट्या असल्याचे माहिती वन अधिकारी यांना देण्यात आली होती, मोकाट बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करणे अपेक्षित असताना देखील तसे झाले नाही अखेर बिबट्याचा अपघात होऊन जीव गेला वन रक्षक टिमने इतक्या दिवस केले तरी काय असा सवाल उपस्थित केला जात असुन दौंड तालुका वन विभागीय वरिष्ठ अधिकारी यांनी जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत दुर्लक्ष केले असल्याने वन प्राण्याचा
पुणे सोलापूर महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला असल्याने खंत व्यक्त केली जात आहे.
पुणे बाजुंकडून सोलापूर बाजुकडे जात असलेल्या अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने बिबट्याच्या तोंडाला जोरदार धडक दिल्याने बिबट्या उडून हायवे बाजुला पडला असल्याने त्याचे अंग व पाय शाबुत राहिले मात्र या अपघातामध्ये बिबट्याचा जीव गेला आहे, या प्रसंगी स्थानिक नागरिकांना काही सुचेनासे झाले होते, काय करावे कळेना, बिबट्या जवळ जाण्याचे कोणाचे धाडस होईना नागरिकांनमधुन वन अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही स्थानिक पत्रकार अनिल गायकवाड यांना संपर्क साधला त्यांनी दौंड विभाग वन अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नसल्याने यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना संपर्क साधुन पुणे सोलापूर महामार्ग नाईकबाग भुलेश्वर फाटा येथे अज्ञात वाहन चालकाने बिबट्याला जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची खबर दिली, काही वेळातच यवत पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचले, हि बातमी गावभर पसरली बिबट्या बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती, यवत येथील वनपाल सचिन पुरी घटना स्थळी पोचले त्यांनी वरीष्ठ वन अधिकारी यांना संपर्क साधुन बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती दिली, दौंड वन विभागाचे टिम पथक ॲम्बुलन्स वाहनासह घटनास्थळी पोचले.
वन पथकाने बिबट्याला बंद पिंजऱ्यात ठेवून पिंपळगाव येथिल वन विभाग कार्यालय येथे नेणार असल्याचे वनरक्षक सचिन पुरी व दौंड विभाग पथकाने सांगितले, पुढील तपास वरिष्ठ वन अधिकारी दौंड करीत असल्याचे त्यांनी सांगितले, या वेळी यवत येथील वनरक्षक सचिन पुरी, वनपाल अंकुश खरात, तसेच दौंड तालुका वन पथकातील शिवकुमार बोंबले वनरक्षक राहू नानासाहेब चव्हाण वनरक्षक पिंपळगाव नचिकेत अवधानी व इतर कर्मचारी उपस्थित होते, यवत येथील नाईकबाग परीसरात गेली तीन महिन्या पासून बिबट्याचे या परीसरात वास्तव्य असल्याने नागरिकांनी तत्पूर्वी दौंड वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बिबट्या पकडण्याची नागरिकांन कडून मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांनी विभागीय उपाय योजना राबवण्या ऐवजी टाळाटाळ करीत दुर्लक्ष केले असल्याने बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला या घटनेला नेमके जबाबदार तरी कोण ? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.