श्रीगोंद्यात पाचव्या दिवशीही संपकरी सरकारी निम सरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संपाला उदंड प्रतिसाद!

By : Polticalface Team ,18-03-2023

श्रीगोंद्यात पाचव्या दिवशीही संपकरी सरकारी निम सरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संपाला उदंड प्रतिसाद!
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- राज्य सरकार जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत संपूर्ण राज्यात राज्य सरकारी- निमसरकारी -शिक्षक- कर्मचारी यांच्यासह विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप कायम ठेवला आहे. श्रीगोंदे तालुक्यात पाचव्या दिवशी शनिवारी 18 मार्च रोजी सर्व संघटनांचे कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयाचे प्रांगणात ठिय्या आंदोलन करून एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देत तहसील परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी भाऊसाहेब गिरमकर व ज्योती गिरमकर यांनी जुन्या पेन्शनवर गीत गाताना म्हटले आहे की पेन्शनचा हक्क माझा मी सरकारला मागते या न्याय तत्वाला मी जागते" असे गीत सादर करून उपस्थित संपकरी कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. याबरोबरच वर्षा कोल्हे, रूपाली आळेकर, उषा वाणी, नितीन भोईटे, संजय खराडे, जयराम धांडे यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत आई जगदंबेला साकडे घालत अविस्मरणीय असे आराध्य गीत सादर केले. यावेळी त्यांनी गाण्यातून कर्मचारी बंधूंनो संप काळात घरी नका राहू, आम्ही तुमच्या मागे मागे अशा प्रकारचा जोगवा गीत गात सरकारचे मन वळविण्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांची मने हेलावून टाकली. याप्रसंगी जवळपास 700 च्या दरम्यान संपकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आयोजित ठिय्या आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी नाना करांडे हे होते. यावेळी प्राथमिक शिक्षक रमेश कुसाळकर यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संप हा शासन निर्णयाच्या विरुद्ध असून, शासनाचा इरादा हा खाजगीकरणाचा आहे. ही लढाई ही भविष्यात पुढील पिढीसाठी आहे. संप करणे हा कर्मचाऱ्यांना घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केले आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने मेस्मा लावला, तुरुंगात टाकले, आम्हाला जामीन देखील कोणी होऊ नका, प्रसंगी आम्ही जेल भोगू परंतु पुढील पिढीला जुनी पेन्शनसाठी न्याय मिळवून देऊ असे सांगून अखेर पर्यंत सर्वांनी एक संघ लढा द्यावा, समन्वय समितीचा अंतिम निर्णय आल्याशिवाय कोणीही संपातून माघार घेऊ नये असे कुसाळकर यांनी ठणकावून सांगितले.

याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे संदीप लगड यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, एनपीसी धारकांनी संपामध्ये शंभर टक्के उपस्थित राहिले पाहिजे. जे संपात सक्रिय आहेत ते मावळे आहेत. संपाबाबत प्रत्येकाची ठाम भूमिका असावी. संघटने शिवाय कर्मचाऱ्यांना कोणताच न्याय मिळू शकत नाही याचा आपण सर्वांनी यापूर्वी अनुभव घेतला आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे. राज्यात 20 लाख कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे कोणीही डगमगून जाण्याचे कारण नसल्याचे लगड यांनी यावेळी सांगितले. वनविभागाचे कर्मचारी संदीप भोसले यावेळी म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटनेमध्ये सक्रिय व्हावे, कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. शासन संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून, राज्याची समन्वय समिती पूर्ण ताकदीनिशी सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. नोकरी मिळवणे सोपे, परंतु कामावरून काढणे तितके सोपे नाही. आणखी पुढे बोलताना श्री लगड म्हणाले की, कोरोना कालावधीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी दूत म्हणून सर्वांच्या मागे उभे राहिले. त्यामुळे अनेकांचे प्राण या कालावधीत वाचले. जर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर वनविभागाचे सर्व कर्मचारी सामूहिक राजीनामा देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत. असे वचन श्री भोसले यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख जावेद सय्यद, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव रमजान हवालदार, सोपान बिडगर, भाऊसाहेब दातीर, आदींनी शासनाच्या धोरणाविरुद्ध कडाडून भाषणे केली. यावेळी राज्य निमसरकारी समन्वय समितीचे शेख मुबारक, भीमराव पवार, अनिल जगताप, पानसरे भाऊसाहेब, अनिेल जाधव महेश शिंदे, संदीप राजे भोसले, जे एस सदाफुले, शरद गावडे, नानासाहेब कुरुमकर, नंदकुमिार कुरुमकर, विजय काटे, राजेंद्र वाळुंजकर, सतीश भालेराव, सचिन झगडे आदींसह समन्वय समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय रामफळे यांनी केले. आभार राजकुमार इथापे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष