जुनी पेन्शन मिळावी यासाठी सोलापूर शहरात काढला विराट महामोर्चा न भूतो न भविष्यती अशी गर्दी
By : Polticalface Team ,18-03-2023
करमाळा प्रतिनिधी सोलापूर शहरात आज जुन्या पेन्शन साठी विराट मोर्चा काढण्यात आला या विराट मोर्चामध्ये सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन तसेच एक रुपयाचा कडीपत्ता मुख्यमंत्री बेपत्ता, या शासनाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत विराट मोर्चा निघाला होता सदरचा विराट मोर्चा सोलापूर शहरातून निघून अखेर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यामध्ये सोलापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील मोर्चेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा विराट मोर्चा हा सोलापूर जिल्ह्यातील लक्ष वेधून घेत होता सदरच्या पेन्शन धारकाच्या विराट मोर्चा ने सरकार आता कोणता पवित्रा घेणार याकडे पेन्शन धारकाचे लक्ष लागले आहे
जुनी पेन्शन मिळावी यासाठी सदरचा काढलेला महामोर्चा न भूतो न भविष्यती असा होता सदरचा मोर्चा शांततामय पद्धतीने शासन विरोधी घोषणा देत निघाला होता सोलापूर जिल्ह्याच्या कारकीर्द मध्ये सदरचा विराट महामोर्चा हा ऐतिहासिक मोर्चा म्हणून पाहिला जात आहे
वाचक क्रमांक :