दौंड शहरातील लांडगेवाडा कुंभार गल्लीत घरफोडी, बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी १ लाख ७ हजार रुपये दागिन्यांची लुटमारी

By : Polticalface Team ,19-03-2023

दौंड शहरातील लांडगेवाडा कुंभार गल्लीत घरफोडी, बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी १ लाख ७ हजार रुपये दागिन्यांची लुटमारी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १९ मार्च २०२३ दौंड शहरातील लांडगे वाडा कुंभार गल्ली दौंड ता दौंड जिल्हा पुणे येथील रहिवासी शमीम बादशाह शेख यांच्या घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरांनी दि १७/०३/ २०२३ रोजी रात्री १० ते सकाळी १० वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरुन नेले, या संदर्भात दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी शमीम बादशाह शेख यांनी तक्रार केल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि १७/०३/२०२३ रोजी रात्री १० वा दरम्यान शमीम बादशाह शेख व मुलगा शाहिद बादशाह शेख राहते घरी असताना फिर्यादी यांची मैत्रीण वैशाली प्रशांत घोडेस्वार रा, कुंभार गल्ली हिने तीच्या घरी जेवण करण्यासाठी बोलले असल्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा हे दोघे जाताना त्यांनी त्यांच्या घराचेदार बंद करून कडी कुलूप लावून मैत्रीणीच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते, रात्री उशिरापर्यंत खानपान झाले असल्याने शमीम बादशाह शेख व मुलगा शाहिद बादशाह शेख दोघेही मैत्रीणीच्या घरीच राहिले होते, दुसऱ्या दिवशी दि,१८/०३/२३ रोजी सकाळी १० वा दरम्यान मुलगा शाहिद शेख घरी गेला असताना त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप कोणीतरी तोंडुन घरातील सामानाची उलथापालथ झालेली दिसुन आली घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे होते, त्यातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले पाहताच शाहिदने फिर्यादी आईला तातडीने घरी बोलावले कोणीतरी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकुण १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरुन नेले असल्याची खात्री झाली, त्यामध्ये ४० हजार रुपये किमतीची गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याची चैन २० हजार रुपये किमतीची ४.३ ग्रॅम सोन्याची अंगठी,११ हजार रुपये किंमतीची चांदीच्या पायातील पैजन व ३६ हजार रुपये रोख असे एकूण १ लाख ७ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई आबनावे तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी