श्रीगोंदा प्रतिनीधी
दूधभेसळ प्रकरणी अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दुधात भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांना मिळाली होती . त्यानुसार पथकाने बाळासाहेब पाचपुते याच्या गोठ्यात छापा घातला असता , तेथे बनावट दूध तयार होत असल्याचे समोर आले . दुध भेसळ होत असल्याची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य केमिकल व औषध पुरवठा करणाऱ्या संदीप मखरे यास अटक केली . न्यायालयाने त्यास दोन दिवसांची कोठडी सुनावली . दरम्यान , याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून , त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे . यातील बाळासाहेब पाचपुते याचा पोलिस शोध घेत आहे
वाचक क्रमांक :