श्रीगोंद्यात सातव्या दिवशी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भव्य जागरण गोंधळ या ठिया आंदोलनात कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थित

By : Polticalface Team ,20-03-2023

श्रीगोंद्यात सातव्या दिवशी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भव्य जागरण गोंधळ 

     या ठिया आंदोलनात कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थित लिंपणगाव (प्रतिनिधी)- गेल्या सात दिवसापासून राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे शासन मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन तसेच विविध मागण्यांसाठी निर्णय घेत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात राज्यव्यापी संप अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामध्ये श्रीगोंदे तालुक्यात संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी श्रीगोंदा तालुका कर्मचारी समन्वय समितीने घंटा थाळी वाजवत, जागरण गोंधळ, भारुड गीते, पोवाडे गीत गात शासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी 1000 च्या पुढे ठिय्या आंदोलनात कर्मचारी उपस्थित होते. आयोजित ठिया आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी महसूल कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष श्रीमती पल्लवी नांगरे ह्या होत्या.

याप्रसंगी सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आंदोलन स्थळी पाठिंबा देत मार्गदर्शन करताना म्हणाले की, जुनी पेन्शन ही शासन दरबारी कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे. सर्व संघटनांनी एकत्रित लढा कायम ठेवावा. यश मिळणार आहे. संप मोडीत काढण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करीत आहे. अशा प्रसंगी सर्वांनी एकत्रित तीव्र असा लढा कायम ठेवावा राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याच्या मानसिकतेत असून खाजगीकरणाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचे दिसते शासनाला कंत्राटी पद्धत राबवायची असेल तर खासदार, आमदारांना देखील कंत्राटी पद्धतीने द्या असा उपरोक्त टोला राज्य सरकारला लगावला. सरकार सरकारी योजना राबवताना कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारची कामे करून घेतात. मग त्या कर्मचाऱ्यांना हक्कापासून वंचित का? ठेवत आहे. असा सवाल उपस्थित करत. कर्मचाऱ्यांनी आपल्या आंदोलनावर ठाम राहावे आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत असे सांगितले

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, सर्व कर्मचारी बहुजन समाजाची व शेतकऱ्यांची मुले आहेत. टाटा बिर्लाची मुले नाहीत. शासनाने कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता जुनी पेन्शन योजना लागू करून विविध मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला देखील कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यावेळी बोलताना म्हणाले की, शासन कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत आहे. भाजपशासित सरकारने 2005 रोजी सरकार सत्तेवर असताना जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा कायदा पारित केला. परंतु कर्मचारी संघटनांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी सम्रावस्था पसरली आहे. सरकारला मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी गांभीर्य नाही. सात दिवस राज्यव्यापी संपावर सर्व कर्मचारी संपावर आहेत. शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. संपामुळे राज्यात सर्वच शासकीय कामे ठप्प आहेत. सरकारने तात्काळ राज्य शासकीय समन्वय समितीला चर्चेसाठी बोलावून जुन्या पेन्शन सह विविध मागण्या मान्य करावेत. दुटप्पी भूमिका शासनाने घेऊ नये, उपस्थित कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत शेलार यांनी सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.

यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब बरकडे, शिक्षक नेते पी जे दरेकर, विशाल कवडे, नितीन शेळके, नगरसेवक भाऊसाहेब खेतमाळीस यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी, भावडी, आढळगाव, पेडगाव ,अधुरेवाडी, आर्वी, चांभुर्डे, छत्रपती क्रांती संघटना, जिल्हा लिंगायत संघटनेचे सुभाष बोराडे, विजय गायकवाड, धनंजय सोनवणे, आकाश जगताप, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी पत्रकार संघटनेच्या वतीने राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी संपाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी इबटा संघटनेचे रवींद्र होले, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश भोसले, विठ्ठल सोनवणे, शरद राऊत, रमजान हवलदार, हनुमंत रायकर, संतोष गायकवाड, मंगल साबळे आदींनी कर्मचारी मागण्यांसंदर्भात शासनाची वेळ काढू भूमिका याविषयी सविस्तर भाषणे झाली.

या ठिय्या आंदोलनामध्ये मच्छिंद्र धोत्रे यांनी पेन्शनवर पोवाडा गीत गायले .तर साई शिंदे यांनी पाळणा गीत तसेच वर्षा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ आराध्य गीत गाऊन राज्य सरकारचे मागण्यासंदर्भात लक्ष वेधले. यावेळी विविध शासकीय निमशासकीय शिक्षक समन्वय समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबनराव गाडेकर व दिलीपराव काटे यांनी केले. आभार जे एस सदाफुले यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.