शाळेच्या स्लॅबचा तडा अंगावर पडून दोन विद्यार्थी जखमी.
By : Polticalface Team ,23-03-2023
अहमदनगर प्रतिनिधी -
नगर तालक्या तील चिंचोली पाटील रयत शिक्षण संस्थाचे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील इमारतीच्या नवीन बांधकाम केलेल्या खोलीत दुपारी तीन वाजता शाळा चालू असताना नवीन बांधकामाचा स्लॅपचे प्लास्टर अंगावर पडून दोन विद्यार्थी जखमी झाले १सागर रघुनाथ कोकाटे २ प्रणित प्रशांत कोकाटे हे दोन नववीत शिकणारे विद्द्यार्थी जखमी झाले. त्या मुळे बाकीचे विद्यार्थी बाहेर आले या शाळेचे बांधकाम चालू असून त्या लागणारी मटेरियल निकृष्ट दर्जा चे आहे या वरून हे सिद्ध होते या कडे प्रशासन यांचा पण हलगर्जी पणा दिसून येतो. पालक याबाबत शिक्षण अधिकारी त्यांच्याकडे तक्रार करणार आहेत. नशीब चान्गले म्हणून मुलांना जास्त लागलं नाही. या कामाची चोकशी करण्याची मागणी होत आहे.तसेच बांधकाम करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर पालक गुन्हा दाखल करणार असलचे समजते.
वाचक क्रमांक :