महिला महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात कोण ठरणार बाहुबली, सांगलीत आजपासून रंगणार थरार. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीरांचा सहभाग.

By : Polticalface Team ,23-03-2023

महिला महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात कोण ठरणार बाहुबली, सांगलीत आजपासून रंगणार थरार. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीरांचा सहभाग.
दि 23 मार्च सांगली : येथील जिल्हा क्रीडा संकुलात आज पासून पहिल्याच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्यासह दिग्गज महिला कुस्तीगीरांनी महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उडी घेतल्यामुळे पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता कुस्ती शौकिनांना लागली आहे.

महिलांची कुस्ती सुरू झाल्यापासून महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा याशिवाय अनेक स्पर्धा पार पडल्या. मात्र पुरुषाप्रमाणे महिलांची देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी याबाबत अनेकदा महिला कुस्तीगीर यांचेकडून मागणी होत होती. कुस्तीगीर परिषदेने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची कीर्ती पताका फडकावणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा यावर्षीपासून सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा बहुमान सांगली जिल्ह्याने पटकवला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष तथा सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीला मिळावी यासाठी कुस्तीगीर परिषदेकडे मागणी केली होती. सांगली जिल्हा तालीम संघाने या स्पर्धेच्या यजमान पदाची जबाबदारी तयारी घेतली आहे. राज्यातील जिल्हा तालीम संघ आणि महानगरपालिका असे 44 संघातील अंदाजे 450 महिला कुस्तीगीर स्पर्धेसाठी दाखल होणार आहेत. 50,53,55, 57,59,62,68, आणि 72 किलो याप्रमाणे वजन गट असणार आहेत. तसेच महिला केसरी किताबासाठी 65 ते 76 वजन गटातील महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत

महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूर जिल्ह्यातील वैष्णवी कुशाप्पा उतरली आहे. मूळची पट्टणकोडोलीची वैष्णवी अनेक पदकाची मानकरी आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर ती पहिल्यांदा स्पर्धेत नशीब आजमावणार आहे. तिच्या जोडीला शिरोळ येथील कोल्हापूर शहराचे प्रतिनिधीत्व करणारी अमृता पुजारी आखाड्यात उतरणार आहे. ज्युनिअर, महिला मिनी ऑलिंपिक, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत तिने पदके मिळवली आहेत. आक्रमकपणे धाडसाने लढण्याची तिची ख्याती आहे. पहिला महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूर जिल्ह्याला मिळवून देण्याच्या इराद्याने तिने आखाड्यात उडी घेतली आहे. यजमान सांगली जिल्ह्यातून तुंगची प्रतीक्षा बागडी मोठ्या अपेक्षेने स्पर्धेत उतरली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत तिने आत्तापर्यंत सांगलीचा डंका वाजवला आहे घरच्या मैदानात खेळताना प्रेक्षकांचाही पाठिंबा तिच्या पाठीमागे असणार ही तीची जमेची बाजू आहे. सातारची धनश्री मांडवे ही महिला पोलीस महाराष्ट्र केसरी किताब खांद्यावर घेण्यासाठी इराद्याने मैदानात उतरली आहे. धनश्री पोलीस प्रबोधणीत सराव करीत असून शालेय नॅशनल ज्युनिअर आणि ऑल इंडिया स्पर्धेत तिने पदक मिळवले आहे.नगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती भाग्यश्री फंड देखील महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नशीब आजमावणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव तीच्या पाठीशी असल्याने स्पर्धेत तीचे तगडे आव्हान असणार आहे. तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मल्ल कोमल गोळे देखील पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज महिला कुस्तीगीर पहिल्याच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उतरल्याने स्पर्धेची चुरस वाढले आहे. मानाची गदा जिंकून सांगलीच्या आखाड्यात कोण इतिहास निर्माण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागले आहे
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला मल्लांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दरवर्षीच महिलांच्या कुस्ती स्पर्धा होत असल्या तरी यावर्षी प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके पदक गळ्यात असली तरी मानाची महाराष्ट्र केसरी पदाची गदा खांद्यावर घेण्यासाठी अनेक महिला मल्ल्यानी शड्डू ठोकून आखाड्यात उडी घेतली आहे. चुरशीच्या रंगतदार लढतीचा थरार कुस्ती शौकिनांना पाहायला मिळणार आहे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.