आ. संजयमामा शिंदे यांची रस्त्याच्या दुर्दशेमुळे होऊ लागली प्रवासाची तारांबळ, श्रमदानातून जनशक्ती संघटनेने सुरू केले रस्त्याचे काम
By : Polticalface Team ,24-03-2023
करमाळा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा शिवाय करमाळा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी संजयमामा शिंदे यांच्या गावापासून करमाळ्याकडे जाणारा म्हणजे निमगाव टें. ते उपळवाटे - केम रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्यासाठी शासन व प्रशासनाकडून शिवाय आजी-माजी लोकप्रतिनिधी कडून या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले.
रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय व खड्डेयुक्त असल्याने शेतकरी, दूधवाले, शाळकरी मुले अशा वाटसरूंना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. शिवाय दर शुक्रवारी आ. संजयमामा शिंदे यांनाही या रस्त्यावरून जाताना येताना तारेवरची कसरत करावी लागत होती. म्हणून अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती संघटनेच्या वतीने श्रमदान आज या रस्त्यावर मुरूम भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. श्रमदानातून डागडुजी होत असलेल्या या रस्त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसहित शेकडो गाववाल्यांनी हातभार लावला, अनेकांनी ट्रॅक्टर, डिझेल, टिपर, जेसीबी अशा मशिनींचे सहकार्य केले.
माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे - केम रस्तावर भले मोठे खड्डे पडले होते. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. किंबहुना आजी-माजी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार संजय शिंदे यांचा हा नेहमीचाच रस्ता. ते या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देतील अशी अशाअपेक्षा वाटसरूंना लागली, मात्र कार्यकाळ संपत आला तरी देखील या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यांना स्वतःला देखील या रस्त्यावरून जाताना येताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीची होणारी ही हेळसांड पाहून जनशक्ती संघटनेने श्रमदानातून हा रस्ता तयार करण्याचे हाती घेतले.
दरम्यान जनशक्तीच्या या श्रमदान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वादविवाद होऊ नये यासाठी अगोदरपासूनच पोलीस पथक तैनात होते. शिवाय उप अभियंता पी.के., शाखा अभियंता आर. व्हि. डेंगले, मंडलाधिकारी एस.सि. डिकोले, तलाठी एल. जि.मोगल, ग्रामसेवक एच.ए.बनाते आधी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यांनीही उत्तरदायित्व दाखवत ठेकेदाराकडून पाणी मारण्यासाठी टँकर, व टाकलेल्या मुरमावर फिरवण्यासाठी रोलरची तजवीज केली.
हे श्रमदान आंदोलन यशस्वी करण्यासाठी माढा लोकसभा शिवसेनेचे नेते संजय कोकाटे, माजी सरपंच सतिश शिरस्कर, माजी उपसरपंच प्रकाश खूपसे, संपर्कप्रमुख रेश्मा राऊत, संपर्क प्रमुख गणेश वायभासे, नितीन जगताप, आबा मस्के, बिबीशन शिरसाट, राज कणसे, बाबाराजे कोळेकर, गणेश ढोबळे, शरद एकाड, अतुल राऊत, बालाजी तरंगे, रामराजे डोलारे, बापू धोत्रे, मोहन गायकवाड, विजय खुपसे, दीपक खूपसे, विशाल खूपसे, शुभम गायकवाड, अक्षय देवडकर, कल्याण गवळी, रोहन नाईकनवरे, वैभव मस्के, साहेबराव विटकर, विशाल खूपसे, दत्तात्रय खूपसे, संतोष खूपसे, दीपक खूपसे, गणेश सुनील खूपसे, अभिमान गायकवाड , संजय मोळ्या जाधव, लक्ष्मण जाधव, दिलीप जाधव, सुरेश देवडकर, प्रभाकर घाडगे, हनुमंत चव्हाण, राजाभाऊ देवडाकर ,नवनाथ जाधव ,अशोक जाधव, शिवाजी जाधव, सुनील जाधव, सचिन घाडगे सुहास देवडकार संजय माळी गणेश माळी,शरद सपाटे,संतोष सपाटे,वैभव काळे व मोठया संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.
▪️ चौकट
टक्केवारीमुळे कामे व्यवस्थित होत नाहीत
- रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाल्यावर ठेकेदाराकडून अधिकारी व लोकप्रतिनिधी सुद्धा टक्केवारी घेतात. त्यामुळे साहजिकच ठेकेदारांना दुय्यम कॉलिटी ची कामे करून बिले काढावी लागतात. याचा मनस्ताप जनतेला होतो. ज्या जनतेने मतं टाकून या लोकांना निवडून दिले आहे, त्या जनतेला त्रास देण्याचे पाप लोकप्रतिनिधी कडून होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे.
अतुल खूपसे पाटील
संस्थापक जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.