चिखलठाण वाडी येथील ग्रामस्थांनी दिले ग्रीन हेरॉन पक्षाला जीवदान!

By : Polticalface Team ,25-03-2023

चिखलठाण वाडी येथील ग्रामस्थांनी दिले ग्रीन हेरॉन पक्षाला जीवदान! लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील मौजे चिखलठाणवाडी येथील जुनाट वडाच्या झाडावर वन्य प्राण्यांपैकी ग्रीन हेरॉन (राखाडी बगळा) या नावाचा पक्ष अनेक दिवसांपासून झाडावर वास्तव्य करत होता. परंतु अचानक या पक्षाला भुरळ आली असावी, आणि तो पक्षी झाडावरून खाली कोसळला. दरम्यान उन्हाळी हंगाम असल्यामुळे वयोवृद्ध ग्रामस्थ व काही नागरिक त्या वडाच्या झाडाखाली गार सावलीचा आस्वाद घेत असताना ,अचानक वडाच्या फांदीवरून एक पक्षी कोसळला त्या पक्षाने नकळत आवाज देत त्याला पंख देखील हलवता येत नव्हते. अशा परिस्थितीत काही ग्रामस्थांनी जयराम धांडे यांना ही कल्पना ग्रामस्थांनी दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून घडलेल्या घटनेची कल्पना दिली. त्यावेळी तात्काळ वनविभागाचे वनरक्षक चंद्रकांत मरकड व संभाजी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर पक्षाला पुढील प्राथमिक उपचारासाठी श्रीगोंदा येथील वनविभागाच्या कार्यालयात घेऊन गेले. उपचारानंतर ग्रीन हेरोन या जखमी पक्षाला उपचारानंतर संबंधित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दौंड येथील वन्य प्राणी मित्राशी संपर्क करून अनिकेत तुपे, अभिजीत जठार, नचिकेत अवधणे या रेस्क्यूटीम च्या मित्रांनी तात्काळ पुणे येथे वन्यजीव प्राणी संग्रहालयात या पक्षाला दाखल केले. दरम्यान ग्रामीण भागामध्ये अनेक ग्रामस्थ वन्यजीव प्राण्यांच्या वर दया दाखवत उन्हाळी हंगामामध्ये झाडांवर लटकते पानपोही तयार करून आकाशात भटकणाऱ्या विविध प्राण्यांना भटकंतीनंतर वेळेत धान्य व पाणी मिळावे म्हणून प्रेम करतात. सामाजिक भावनेतून वन्य प्राण्यांवर भरपूर प्रेम करून त्या उडत्या पक्षांना आधार देतात. निश्चितच ही बाब मानव धर्म म्हणून अनेक गावोगावी ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत. ही बाब अभिमानास्पद आहे. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून चिकलठाण वाडी येथील ग्रामस्थांनी ग्रीन हेरॉन ग्रामीण भागामध्ये या पक्षाला राखडी बगळा असे म्हणतात. हा पक्ष तुरळक ठिकाणीच निदर्शनास येतो. दरम्यान सदर पक्षाला ग्रामस्थांनी लक्ष दिले नसते, तर कुत्रे मांजर इत्यादींनी या पक्षाचे भक्षण केले असते. परंतु चिकलठाणवाडी येथील ग्रामस्थ हे धार्मिक क्षेत्रातील असून, त्यांनी तात्काळ सदरचा पक्ष वडाच्या झाडावरून पडल्यानंतर त्या पक्षाला पाणी धान्य टाकले एवढ्यावरच ते थांबले नाही तर वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क करून त्या पक्षाच्या घडल्या घटनेची माहिती देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी देखील आपले कर्तव्य म्हणून ग्रीन हेरॉन या पक्षाला त्याला त्याचे पूर्ण आयुष्य लाभावे म्हणून पुढील उपचार करण्यासाठी पुणे येथे प्राणी संग्रहालयामध्ये दौंडच्या रिक्वेस्टीम संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली. त्यांना धन्यवाद देत मौलिक सहकार्याबद्दल चिखलठाणवाडी ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी