By : Polticalface Team ,26-03-2023
पुणे प्रतिनिधी -दि. २३ तारखेला लहूजी आर्मी च्या वतीने पुण्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या कर्वे पुतळा येथील कार्यालय समोर जवाब दो : मातंग समाज एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी
१) अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे या मागणी साठी दिनांक – २२/०२/२०२३ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर जवाब दो आंदोलन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले. याची दाखल घेत विधानसभेत मा. आमदार सुनीलभाऊ कांबळे यांनी क्र. ३ ची लक्षवेधी दिनांक – ०३/०३/२०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये मंडली होती त्याला उत्तर देताना आमदार मा. संजय राठोड यांनी सन २००४ मधील ई. व्ही. चिन्नय्या खटल्याचा दाखला देत उपवर्गीकरण न करण्याचे मा. सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याचे सांगितले होते, परंतु सुप्रीम कोर्टाने चेब्रालु लीला प्रसाद vs आंध्र प्रदेश खटल्यात दिनांक २२/०४/२०२० रोजी व देवेंदर सिंह vs पंजाब खटल्यात दिनांक – २७/०८/२०२०रोजी दिलेल्या निकाला मध्ये स्पष्टपणे आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची शिफारश केली आहे. असे असताना सभागृहात चुकीच्या माहिती मुळे वर्गीकरणाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे.
२) पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण फुटून आलेल्या महाप्रलयाला यावर्षी ६३ वर्ष पूर्ण झाली. या महाप्रलायामध्ये शिवाजीनगर या भागात असलेले मांग वाड्यांमधील अनेक मातंग कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्याचे पुनर्वसन सहकार नगर आणि पद्मावती या भागात करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने मातंग समाज्याच्या घराच्या बदल्यात हि जागा दिली होती. अनुसूचित जाती मधील मातंग समाजातील पूरग्रस्तांसाठी एकूण आठ मागासवर्गीय सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत, त्यामध्ये मूळ सभासद, वारस नोंद यांची अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. परंतु पर्वती मतदार संघाच्या आमदार मा. माधुरी मिसाळ यांनी जातीय मानसिकतेतून जाणीवपूर्वक मा. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व समाज कल्याण विभाग यांच्यावर दबाव टाकून सदर प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा घाट घालत आहे. तसेच त्यांच्या सोबत काम करत असलेल्या अनेक कार्यकर्त्याकडे असलेले या संस्थामधील जागा त्यांच्या नावे कशी करता येईल. यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मातंग समाजाचे प्रश्न आजतागायत प्रलंबित आहेत.
३) आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात येणार आहे. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने भूमी अधिग्रहण करण्यासाठी ८७ कोटी ११लाख देऊ केले मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे याच्या राष्ट्रीय स्मारकाला कोणत्याही प्रकारे निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे मातंग समाजाची अस्मिता असलेले राष्ट्रीय स्मारक होणार नसल्याने मातंग समाजाच्या भावनांशी सरकार खेळ करत आहे का ?, त्यामुळे या अधिवेशनात या स्मारकासाठी भरीव तरतूद करण्यात यावी.
४) अनेक वर्ष झाली तरी मातंग समाजाला समाज कल्याण विभाग व राज्य शासनाच्या योजना मिळत नाहीत नसल्याने आजही मातंग समाजाचा विकास झाला नाही. तो विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टि) च्या धर्तीवर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टि) स्थापन करण्यात यावी.
मागण्या करण्यात आल्या. याबाबत संघटनेचे अध्यक्ष अंबादास सुर्यवंशी म्हणाले की, शिंदे आणि भाजप सरकार हे मातंग समाजाला फसवण्याचे काम करत आहे. कोणतीही अद्ययावत माहिती न घेता विधानसभेत चुकीच्या माहितीच्या आधारे अनुसूचित जातीचे वर्गीकरण देता येत नाही असे सांगितले हे फार आश्चर्यकारक आहे. तसेच आमदार माधुरी मिसाळ ह्या जातीय द्वेष भावनेतून जाणीव पूर्वक पानशेत पूरग्रस्त गृह संस्था मधील मातंग समाजाच्या जागा त्यांच्या कार्यकर्त्याच्या नावावर करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत आहेत त्यामुळे रक्षकच भक्षक झाले आहे. यामुळे जर मातंग समाजावर अन्याय होणार असेल तर लहूजी आर्मीच्या वतीने सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल.
सदर आंदोलनाला प्रभाकर इंगळे, जयराम तलवारे, सुनील खुडे, गोपीनाथ कांबळे, बापू वेळेकर, परशुराम भवाळ, दिलीप खुडे, वसंत शिंदे, किशोर खुडे, मीरा अवघडे, विशाल ढावरे, सागर वायदंडे, कविता ननावरे, माया वायदंडे, लक्ष्मी खुडे, कमल बागाव, वर्षा खुडे, अश्विनी अवघडे, मीरा आरडे, नंदा शिंदे, मंदा शिंदे, उज्जवला गिरे, तानाजी दाकले, प्रशांत अस्वरे, रमेश राजगुरू, सुनील साळुंखे, गोरख कुपडे आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष